मनी लाँड्रिंग प्रकरणी माजी क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीनला ईडीचे समन्स!

माजी क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीन यांनी आरोप फेटाळले

मनी लाँड्रिंग प्रकरणी माजी क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीनला ईडीचे समन्स!

टीम इंडियाचे माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन अडचणीत सापडले आहेत. मनी लाँड्रिंग प्रकरणी मोहम्मद अझरुद्दीनला ईडीचे समन्स बजावले आहेत. हैदराबाद क्रिकेट असोसिएशनमध्ये (एचसीए) अध्यक्षपदी असताना कोटी रुपयांच्या निधीचा गैरव्यवहार केल्याचा आरोप मोहम्मद अझरुद्दीनवर ठेवण्यात आला आहे.

मनी लाँड्रिंग प्रकरणी माजी क्रिकेटपटू आणि काँग्रेस नेते मोहम्मद अझरुद्दीनला ईडीचे समन्स बजावले आहेत. काँग्रेस नेत्याला ईडीने बजावलेले हे पहिलेच समन्स असून त्याअंतर्गत त्यांना आज तपास यंत्रणेसमोर हजर राहावे लागणार आहे. हे प्रकरण हैदराबादच्या उप्पल येथील राजीव गांधी क्रिकेट स्टेडियमसाठी डिझेल जनरेटर, अग्निशामक यंत्रणा आणि छत यांच्या खरेदीसाठी वाटप केलेल्या २० कोटी रुपयांच्या कथित गैरव्यवहाराशी संबंधित आहे.

हे ही वाचा : 

बदलापूर प्रकरण: महिनाभरानंतर शाळेच्या अध्यक्ष, सचिवांना ठोकल्या बेड्या

स्त्री शक्तीचा जागर: स्वराज्यप्रेरणा जिजाऊसाहेब!

संयुक्त राष्ट्रांच्या सरचिटणीसांना इस्रायलमध्ये बंदी

दुर्गेचे पहिले रूप ‘शैलपुत्री’ – वृषारुढां शूलधरां शैलपुत्रीं यशस्विनीम्

दरम्यान, मोहम्मद अझरुद्दीनने आपल्यावरील हे आरोप फेटाळून लावले आहेत. हे सर्व आरोप खोटे आणि राजकीय हेतून केल्याचे माजी क्रिकेटपटूने म्हटले आहे. माझ्या प्रतिस्पर्ध्यांनी माझी प्रतिमा खराब करण्यासाठी हा केवळ एक स्टंट आहे, असे माजी क्रिकेटपटू आणि काँग्रेस नेते मोहम्मद अझरुद्दीनने म्हटले आहे. दरम्यान, या प्रकरणी ईडीने आता तपास सुरु केला.

Exit mobile version