मोहाली पोलिसांची दोन ठिकाणी कारवाई, ४.३७ कोटी रुपयांची रोकड जप्त!

नाकाबंदी दरम्यान १.४१ तर छाप्यात २.९६ कोटी जप्त

मोहाली पोलिसांची दोन ठिकाणी कारवाई, ४.३७ कोटी रुपयांची रोकड जप्त!

लोकसभा निवडणुकीदरम्यान मोहाली पोलिसांनी दोन ठिकाणी मोठी कारवाई केली आहे.मोहाली पोलिसांच्या दोन वेगवेगळ्या पथकांनी पंजाब-चंदिगढच्या सीमावर्ती भागात गस्त घालताना शहरातील दोन वेगवेगळ्या ठिकाणांहून ४.३७ कोटी रुपये जप्त केली आहे.शहरातील नयागाव आणि झिरकपूर परिसरातून ४ .३७ कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.

मोहाली पोलिसांच्या एका पथकाने नयागाव येथे नाकाबंदी दरम्यान एक कॅश व्हॅन अडवली या कॅश व्हॅनमधून तब्बल १.४१ कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.कॅश व्हॅन चालकाला एवढ्या मोठ्या रकमेबाबत विचारण्यात आले मात्र त्याने समाधानकारक उत्तर दिले नाही.त्यामुळे आयकर विभागाला घटनास्थळी बोलावण्यात आले आणि कागदपत्रांची तपासणी करून रोकड जप्त करण्यात आली, असे पोलिसांनी सांगितले.

हे ही वाचा:

वेंगुर्ले बंदरात बोट पलटली, दोघांचा मृत्यू!

डोंबिवली दुर्घटनेत मृतांचा आकडा ११ वर!

प्रशांत किशोर त्यांच्या निवडणूकपूर्व अंदाजावर ठाम!

‘जो काँग्रेसच्या पावलावर चालेल, तो रसातळाला जाईल’

मोहाली पोलिसांच्या आणखी एका पथकाने शहरातील झिरकपूर परिसरात छापा टाकून २.९६ कोटी रुपये जप्त केले आहे.गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली.या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास पोलीस करत आहेत.दरम्यान, चंदीगड लोकसभा आणि पंजाबमधील लोकसभेच्या १३ जागांसाठी सातव्या आणि शेवटच्या टप्प्यात १ जून रोजी मतदान होणार आहे.

 

Exit mobile version