दहशतवादी पन्नूच्या हत्येच्या कटावर मोदींचे महत्त्वाचे विधान!

आमच्या नागरिकाने काही चूक केली असेल तर चौकशी करण्याची आमची तयारी, पंतप्रधान मोदी

दहशतवादी पन्नूच्या हत्येच्या कटावर मोदींचे महत्त्वाचे विधान!

अमेरिकेने भारतीय नागरिक निखिल गुप्ता यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांवर पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. कोणत्याही देशाने आम्हाला कोणतीही माहिती दिल्यास आम्ही त्यामध्ये नक्कीच लक्ष घालू, असे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे. आपल्या नागरिकांपैकी कोणीही काही योग्य-अयोग्य केले असेल तर त्याची चौकशी करण्याची आमची तयारी असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.मात्र अशा घटनांमुळे भारत-अमेरिका संबंधांवर कोणताही परिणाम होणार नसल्याचेही मोदींनी सांगितले.

सिख फॉर जस्टिस या फुटीरतावादी गटाचे जनरल काउंसिल गुरपतवंत सिंग पन्नून यांच्याविरुद्ध निखिल गुप्ता यांच्यावर हत्येचा कट रचल्याचा आरोप अमेरिकेने नुकताच केला आहे. फायनान्शिअल टाईम्स या ब्रिटीश वृत्तपत्राला दिलेल्या विशेष मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले की, परदेशात लपलेले काही अतिरेकी गट अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली धमकावण्यात आणि हिंसाचार भडकावण्यात गुंतले आहेत.

नुकतेच अमेरिकेच्या न्याय विभागाने सांगितले होते की, निखिल गुप्ता ५२ हा भारतीय नागरिक असून भारत सरकारचा कर्मचारी देखील आहे. उत्तर भारतात वेगळ्या शीख राष्ट्राचा पुरस्कार करणाऱ्या न्यूयॉर्क शहरातील रहिवासी (पन्नून) याच्या हत्येचा कट निखिल गुप्ता याने रचला होता.दरम्यान अमेरिकेने भारतावर आरोप केले मात्र गुरपतवंत सिंग पन्नून याचे नाव घेतले नाही.

हे ही वाचा:

निलंबित खासदारांना मतदानाचा हक्कही नाही; दैनंदिन भत्त्यापासूनही मुकावे लागणार!

तामिळनाडूत पावसाचा तडाखा, १० जणांचा मृत्यू!

डॉ. हेडगेवार स्मृतीस्थळाच्या दर्शनाने ऊर्जा, प्रेरणा मिळते

काँग्रेसची भारत जोडो यात्रा २ जानेवारीमध्ये सुरू होण्याची शक्यता!

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, सुरक्षा आणि दहशतवादविरोधी सहकार्य हे दोन्ही देशांमधील भागीदारीचे प्रमुख घटक आहेत. काही घटनांचा संबंध दोन्ही देशांतील राजनैतिक संबंधांशी जोडणे मला योग्य वाटत नाही. आपण बहुपक्षीयतेच्या युगात जगत आहोत हे सत्य स्वीकारले पाहिजे. जग हे एकमेकांशी जोडलेले आहे तसेच एकमेकांवर अवलंबून आहे. हीच वास्तविकता आपल्याला एकमेकांना सहकार्य करण्यास भाग पाडते, कारण सर्व बाबींवर पूर्ण सहमती असू शकत नाही, असे मोदी म्हणाले.

काय प्रकरण आहे?
अमेरिकेच्या न्याय विभागाने म्हटले आहे की, निखिल गुप्ता या ५२ वर्षीय भारतीय नागरिकाने, जो भारत सरकारचा कर्मचारी देखील आहे.निखिल गुप्ता याने न्यूयॉर्क शहरातील रहिवाशाच्या हत्येचा कट रचला होता.न्याय विभागाने खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूचे नाव घेतले नाही.मात्र, गुरवतपंत सिंग पन्नू हा अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात राहत असल्याने त्याच्याकडे बोट दाखवल्याचे दिसून येते. विभागानुसार, भारतीय नागरिक निखिल गुप्ता सुरक्षा व्यवस्थापन आणि गुप्तचर माहिती पाहत असे.तसेच पन्नूच्या हत्येसाठी एक लाख डॉलर देण्याचे आश्वासन दिल्याचाही आरोप निखिल गुप्तावर आहे. यापैकी ९ जून २०२३ रोजी १५ हजार डॉलर्सचे आगाऊ पेमेंट करण्यात आले. पण, ज्या व्यक्तीला या कामासाठी नियुक्त करण्यात आले होते, तो एका अमेरिकन एजन्सीचा गुप्तहेर असल्याचे न्याय विभागाने सांगितले.

 

Exit mobile version