मोदीजी, बॉर्डरचे गेट उघडा, १५ मिनिटांत बांगलादेश स्वच्छ करू!

भाजप आमदार टी राजा यांची गर्जना

मोदीजी, बॉर्डरचे गेट उघडा, १५ मिनिटांत बांगलादेश स्वच्छ करू!

बांगलादेशात हिंदूंवरील हिंसाचाराबद्दल भारतातील लोकांमध्ये प्रचंड संताप आहे. बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदूंवरील हिंसाचाराच्या विरोधात भारताच्या विविध भागांत निदर्शने केली जात आहेत. याच दरम्यान, भारतीय जनता पक्षाचे तेलंगणाचे आमदार टी राजा सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मोठी मागणी केली आहे. गोव्यात रविवारी (८ डिसेंबर) आपल्या ४८ मिनिटांच्या भाषणात टी राजा सिंह यांनी अनेक मुद्द्यांवर खुलेपणाने भाष्य केले. ज्यामध्ये त्यांनी मुस्लिमांची संख्या, लव्ह जिहाद आणि बांगलादेशातील हिंदूंवर होणारे अत्याचार यासंदर्भात भाष्य केले.

दक्षिण गोव्यातील कुरचोरम येथे विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात बोलताना बांगलादेशचा उल्लेख करत टी राजा म्हणाले, शेजारच्या देशात हिंदूंची हत्या केली जात आहे आणि त्यांची दुकानं लुटली जात आहेत. “ते मदतीसाठी आवाहन करत आहेत. मला सांगायचे आहे की बांगलादेशातील हिंदूंच्या सुरक्षेसाठी ‘बजरंगी’ लढायला तयार आहे. टी राजाने स्वत:चे बजरंगी असे वर्णन केले. टी राजा म्हणाले की, मोदीजी, फक्त १५ मिनिटे बॉर्डरचे दरवाजे उघडा आणि आम्ही बांगलादेश स्वच्छ करू.

तसेच राज्यात वाढत चाललेल्या मुस्लीम लोकसंख्येवर चिंता व्यक्त केली आणि यावर चर्चा करणे आवश्यक असल्याचे म्हटले. पुढील २०-२५ वर्षांत हिंदूंनी ‘हम दो हमारे दो’ या तत्त्वाचे पालन केले, तर त्यांना पाकिस्तानातील हिंदूंसारखे अत्याचार सहन करावे लागतील, असा त्यांनी दावा केला. जर भारतातील मुस्लिम लोकसंख्या वाढत राहिली आणि “जर त्यांचे खासदार ३०० असतील तर पंतप्रधान कोणत्या समुदायातील असतील? त्यांचाच असेल ना?, आणि ज्या देशात त्यांचे पंतप्रधान निवडले जातात तिथल्या हिंदूंची काय अवस्था झाली आहे…इतिहास याला साक्षी आहे, असे टी राजा सिंह म्हणाले.

हे ही वाचा : 

न्यायप्रिय, संयमी व्यक्तिमत्व विधानसभेच्या अध्यक्षपदी लाभल्याचा आनंद

राहुल नार्वेकरांची विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड!

मेघालयचे डॉ. विद्यानिष्ठ मारक यांना ‘माय होम इंडिया’कडून ‘वन इंडिया’ पुरस्कार

दिल्लीतील ४० हून अधिक शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी; ३० हजार डॉलर्सची मागणी

 

Exit mobile version