उद्धव ठाकरे म्हणाले, मोदी देशाचे पंतप्रधान त्यांनी मविआचाही प्रचार करावा!

सोशल मिडीयावर व्हिडीओ व्हायरल

उद्धव ठाकरे म्हणाले, मोदी देशाचे पंतप्रधान त्यांनी मविआचाही प्रचार करावा!

विधानसभा निवडणुकीला काहीच दिवस शिल्लक असताना राज्यात घडामोडींना वेग आला आहे. राज्यातील सर्व पक्ष रिंगणात उतरले आहेत. राज्यभरात प्रचाराचा धुराळा उडत आहे. महायुतीच्या उमेदवारांच्या विजयासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि इतर मंत्र्यांच्या सभा पार पडत आहेत. तर मविआच्या उमेदवारांसाठी काँग्रेस नेते राहुल गांधी, खर्गे यांच्या सभा पार पडत आहेत. याच दरम्यान, उद्धव ठाकरेंनी  पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत केलेल्या वक्तव्याची बरीच चर्चा होत असून सोशल मिडीयावर त्यांच्या वक्तव्याची खिल्ली उडविली जात आहे. विशेष म्हणजे, उद्धव ठाकरेंची अशी बरीच वक्तव्ये आहेत, ज्याला काही आधारही नसतो आणि यमकही जुळत नाही.

उद्धव ठाकरेंची काल (११ नोव्हंबर) वणीमध्ये सभा पार पडली. या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदिंवरून वक्तव्य केल्याने स्वताचा हशा करून घेतला. सभेला संबोधित करताना उद्धव ठाकरे म्हणाले, पंतप्रधान हे देशाचे असतात. देशाचे पंतप्रधान आता नरेंद्र मोदी आहेत. सर्वांशी सारखा वागेन अशी, त्यांनी पंतप्रधान होताना शपथ घेतली आहे.

शपथे प्रमाणे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा महाविकास आघाडीच्या सभेला आले पाहिजे, त्यांनी मविआचा प्रचार केला पाहिजे, अशी मागणी ठाकरेंनी केली. ते केवळ भाजपचे पंतप्रधान नाहीत तर देशाचे पंतप्रधान आहेत. आवडता, नावडता, लाडका असा पंतप्रधानांना अधिकार राहत नसून त्यांना सर्वजण सारखे आहेत, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

हे ही वाचा : 

बॅगेची तपासणी केल्यावर मर्दांच्या पक्षप्रमुखाला घाबरण्याचे कारण काय?

“महाविकास आघाडीला दुसऱ्यांदा महाराष्ट्राची लूट करू देऊ नका”

रशियाला वाढवायचीय लोकसंख्या; मुलं जन्माला घाला, सरकारकडून मदत घ्या!

ऑस्ट्रेलियन वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर ‘विराट’ दर्शन; चक्क हिंदी आणि पंजाबीत

दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याच्या सोशल मिडीयावर बरीच चर्चा होत आहे. यावर अनेकांनी प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरेंचे म्हणणे ऐकून तर्काने आत्महत्या केल्याचे एकाने म्हटले आहे. एकाने तर म्हटले की, जर तसे असेल तर खर्गे यांनी सुद्धा भाजपाचा प्रचार करायला हवा, कारण त्यांच्या पक्षातच इंडियन हा शब्द आहे. आतापर्यंत किती काँग्रेसच्या पंतप्रधांनानी विरुद्ध पार्टीचा प्रचार केला आहे?, अशा दोघांची नावे उद्धव ठाकरेंनी सांगावी, असा प्रश्न एकाने विचारला आहे.

 

Exit mobile version