मोदींनी दिल्या आरोग्य दिनाच्या शुभेच्छा

मोदींनी दिल्या आरोग्य दिनाच्या शुभेच्छा

आज जागतिक आरोग्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीटरवरून समस्त देशवासियांना कोविड-१९ विरुद्धची लढाई चालू ठेवण्याचे आणि निरोगी राहण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे.

मोदींना याबाबत ट्वीट केले आहे. ते म्हणतात की, आज जागतिक आरोग्य दिनी मास्क वापरणे, सतत हात धुणे आणि इतर निर्बंध पाळून आपण कोविड-१९ ला हरवण्यावर लक्ष ठेवून राहूया. त्याबरोबरच त्यांनी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आवश्यक ते उपाय करू असे देखील सांगितले आहे.

हे ही वाचा:

आरोग्यमंत्र्यांनी लसीबाबत दाखवले केंद्राकडे बोट

नक्षलवाद्यांनी जवानाला बंदी बनवले

शरद पवारांनी घेतला लसीचा दुसरा डोस

मोदींनी जागतिक आरोग्य दिवस हा, आपल्या सुरक्षित आरोग्यासाठी रात्रंदिवस झटणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी असतो असे सांगितले आहे. त्याबरोबरच आरोग्याच्या सुविधांमध्ये संशोधनाला चालना देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे स्मरण करून देणारा दिवस असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

त्यांनी सरकार आरोग्य सुविधांमधील नव्या संशोधनासाठी कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार केला.

भारत सरकार आयुष्मान भारत आणि प्रधानमंत्री जनऔषधी योजनांसारख्या योजनांद्वारे लोकांना उत्तम प्रतीची औषधे मिळतील यासाठी प्रयत्नशील आहे. त्याबरोबरच भारत जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहिम राबवत असल्याचे देखील म्हटले आहे.

भारतात गेले काही दिवस सातत्याने मोठी कोरोना रुग्णवाढ नोंदली गेली आहे. भारत सरकारतर्फे १६ जानेवारीपासून कोरोनाविरोधातील लसीकरण मोहीमेला प्रारंभ करण्यात आला.

Exit mobile version