पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी विद्यार्थ्यांशी परिक्षेच्या ताणावर मात कशी करावी याबाबत चर्चा करणार आहेत. ‘परिक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमात परिक्षांचा ताण कसा हाताळावा याबाबत विद्यांर्थ्यांशी ते संवाद साधणार आहेत. आज संध्याकाळी ७ वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
याबाबत मोदींनी ट्वीट देखील केले आहे. ते म्हणतात, “पहिल्या आभासी परिक्षा पे चर्चाची खुप उत्सुकता आहे. ज्यात वेगवेगळ्या मुद्द्यांना स्पर्श करणार आहे. तुम्ही एक्जाम वॉरिअर होऊ शकता, तुम्ही पालक असा किंवा शिक्षक……..प्रत्येकासाठी काही ना काहीतरी नक्की आहे. चला परिक्षांना तणावमुक्त करूया. आज रात्री ७ वाजता पहा.”
हे ही वाचा:
अयोध्येतील रस्त्याला कोठारी बंधूंचे नाव
नववी, अकरावीच्या विद्यार्थ्यांनाही विनापरीक्षा पास करणार
या कार्यक्रमात मोदी विद्यार्थ्यांशी संवाद साधतात आणि त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देतात. या कार्यक्रमाद्वारे ते विद्यार्थ्यांना तणावमुक्त परिक्षांसाठी मार्गदर्शन करतात. परिक्षा पे चर्चाचे हे चौथे वर्ष आहे.
केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी दिलेल्या माहितीनुसार १४ लाख सहभागींनी ‘परिक्षा पे चर्चा’ स्पर्धेसाठी नोंदणी केली आहे. यामध्ये सुमारे साडे दहा लाख विद्यार्थी, २.६ लाख शिक्षक आणि ९२ हजार पालकांचा समावेश आहे. यापैकी सुमारे ६० टक्के विद्यार्थी ९-१०वी चे आहेत. त्याबरोबरच प्रथम ८१ इतर देशांतून देखील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेसाठी नोंदणी केली होती. आज संध्याकाळी ३२ विविध वाहिन्यांवरून या कार्यक्रमाचे प्रक्षेपण होणार आहे.