२१ जून रोजी होणाऱ्या योग दिनाचे औचित्य साधून अमेरिकेतील संयुक्त राष्ट्राच्या मुख्यालयात होणाऱ्या समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी १८०हून अधिक देशांतील व्यक्तींसोबत सहभागी होणार आहेत. सूत्रांनी ही माहिती दिली. यामध्ये विविध वर्गांमधील व्यक्ती सहभागी होतील. यामध्ये राजकीय, कलाकार, शिक्षणतज्ज्ञ आणि उद्योजक सहभागी होतील. दरवर्षी २१ जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ म्हणून साजरा केला जातो. या दिवशी योगाभ्यासाचे महत्त्व सांगून जगभरात योगप्रसाराबाबत जनजागृती केली जाते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी नवव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाला पहिल्यांदाच संयुक्त राष्ट्र मुख्यालयात योग सत्राचे नेतृत्व करतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नऊ वर्षांपूर्वी पहिल्यांदाच संयुक्त राष्ट्र महासभाच्या मंचावर दरवर्षी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्याचा प्रस्ताव सादर केला होता. त्यानंतर ते पहिल्यांदाच संयुक्त राष्ट्र मुख्यालयात योग सत्राचे नेतृत्व करतील. हा एक ऐतिहासिक दिवस असेल.
हे ही वाचा:
सुट्टीवर गेलेल्या उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; मनिषा कायंदे शिवसेनेत जाणार
केरळ चित्रपट दिग्दर्शक रामसिंहन यांचा भाजपला रामराम, पण निष्ठा मोदींसोबत
बस थांब्याला दिले ‘बांगलादेश’ नाव!
प्रकाश आंबेडकर औरंगजेबाच्या कबरीसमोर झुकले
हे योग सत्र २१ जून रोजी संयुक्त राष्ट्र मुख्यालयातील ‘नॉर्थ लॉन’मध्ये सकाळी आठ ते नऊ वाजेपर्यंत होईल. तिथे महात्मा गांधी यांची प्रतिमा स्थापित आहे. भारताने संयुक्त राष्ट्राला महात्मा गांधींची ही प्रतिमा भेट दिली होती. ती गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत भारताच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आली.
या ऐतिहासिक योगसत्रात संयुक्त राष्ट्राचे ज्येष्ठ अधिकारी, राजदूत, सद्स्य देशांच्या प्रतिनिधींसह वैश्विक आणि प्रवासी समुदायाचे प्रमुख सदस्यही भाग घेण्याची आशा आहे. संयुक्त राष्ट्र महासभेचे ७७व्या सत्राचे अध्यक्ष साबा कोरोसी यांनी गुरुवारी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत संयुक्त राष्ट्रात नवव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या समारंभात भाग घेण्यास उत्सुक आहे, असे ट्वीट केले होते.