पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या घरी श्रीगणेशाचे घेतलेले दर्शन आणि तिथे केलेली आरती यावरून गुरुवारी विरोधकांकडून टीका केली गेली. विशेषतः संजय राऊत यांनी या भेटीबद्दल संशय व्यक्त केला तर भाजपाने या भेटीत काहीही गैर नाही, हा आपल्या संस्कृतीचा भाग आहे, अशी टिप्पणी केली.
संजय राऊत यांनी तर या भेटीचा संबंध शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याशी जोडला. राऊत म्हणाले की, आमच्या पक्षासंदर्भातील खटला चंद्रचूड यांच्या पीठासमोर सुरू आहे. त्यामुळे आम्हाला न्याय मिळेल की नाही, याबद्दल आम्हाला शंका आहे. या प्रकरणात न्या. चंद्रचूड आम्हाला न्याय देऊ शकतील का?
संजय राऊत यांनी न्यायालयावरच आरोप केले. इव्हीएमला क्लिन चीट, महाराष्ट्रातील पक्षांसंदर्भात सुरू असलेल्या खटल्याला सतत देण्यात येणाऱ्या तारखा, पश्चिम बंगालमधील बलात्कार प्रकरणावर स्वतः न्यायालयाने घेतलेली दखल पण महाराष्ट्रातील बलात्कार प्रकरणाचा उल्लेखही नाही. दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांना तारखांवर तारखा, हे का होते आहे, असे राऊत यांनी आपल्या एक्स हँडलवरून विचारले होते.
हे ही वाचा:
यामिनी जाधवांच्या बुरखा वाटण्यावर भाजप सहमत नाही !
हवे तर मी खुर्ची सोडते, पण आंदोलन हे सरकार पाडण्यासाठी…
‘काँग्रेसचे पंतप्रधान इफ्तार पार्टी देत असत आणि सरन्यायाधीश तिथे जात, त्याचे काय?’
इस्लामच्या नावे चालत होते चैरिटी होम्स, देत होते बलात्काराची ट्रेनिंग, ४०० मुलांचा बचाव !
संजय राऊत यांनी याआधीही न्यायालयांवर टीका केलेली आहे. ही भाजपाला दिलासा देणारी न्यायालये आहेत, असे त्यांनी म्हटले आहे. शिवसेनेच्या खासदार प्रियांक चतुर्वेदी यांनी चंद्रचूड यांना लक्ष्य केले. उत्सवानंतर न्यायाधीश महाराष्ट्रातील प्रकरणांवर निकाल देतील कदाचित. पण निवडणुका जवळ आल्या आहेत त्यामुळे ही सुनावणी आणखी एक दिवस पुढे ढकलली जाईल.
यासंदर्भात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे खासदार मिलिंद देवरा म्हणाले की, अशा प्रकारचे बिनबुडाचे आरोप करणे हा चुकीचा पायंडा आहे. यामुळे न्यायपालिकेच्या प्रामाणिकपणावर शंका घेण्यासारखे आहे. भाजपाचे राष्ट्रीय सचिव बी.एल. संतोष म्हणाले की, डाव्या पुरोगामींना हे एकमेकांसोबत वावरणे, संवाद साधणे, परंपरा जपणे हे पटत नाही. गणपती पूजेला जाणे हेच अनेकांना पचलेले नाही. या सगळ्यांना एकदा दीर्घ श्वास घ्यावा.
ऍड. इंदिरा जयसिंग यांनी म्हटले आहे की, सर्वोच्च न्यायालयाच्या बार असोसिएशनने याचा निषेध केला पाहिजे.