पंतप्रधान नरेंद्र मोदी, विराट कोहली ट्विटरवर ठरले सर्वाधिक लोकप्रिय!

पंतप्रधान नरेंद्र मोदी, विराट कोहली ट्विटरवर ठरले सर्वाधिक लोकप्रिय!

जगात कुठलीही घडामोड असो वा एखादा प्रसंग त्याचे चांगले-वाईट पडसाद सोशल मीडियावर पडतातच. त्यात ट्विटरवर संबंधित घटनेबाबत नेटकऱ्यांच्या प्रतिसादावरून ट्रेण्ड तयार होतात. त्यानुसार, गेल्या वर्षभरात भारतात कुठले ट्रेण्ड सर्वाधिक चर्चेत होते आणि कुठल्या ट्विटसला सर्वाधिक प्रतिसाद मिळाला. यायबाबत ट्विटरने नुकताच एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विराट कोहली यांच्या ट्विटना सर्वाधिक पसंती असल्याचे दिसले आहे.

इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या तुलनेत ट्विटरवरील ट्रेण्डच्या आधारे संबंधित घटनेबाबत देशाचा नेमका कल कुठे आहे, याविषयी ठोकताळे मांडले जातात. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा भारताला सर्वाधिक फटका बसला होता. त्यावेळी जगभरातून भारतासाठी वैद्यकीय मदत पाठवण्यात आली होती. ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू पॅट कमिन्स यानेही त्यावेळी भारतासाठी पन्नास हजार डॉलर्सची मदत जाहीर केली त्याचप्रमाणे इतर खेळाडूंनीही भारताला मदतीचे आवाहन केले होते. त्यावेळी २६ एप्रिल २०२१ ला केलेल्या या ट्विटला सर्वाधिक म्हणजेच एक लाख १४ हजारांहून अधिक रिट्विट मिळाले होते. हे ट्विट भारतातील गोल्डन ” ट्विट ऑफ द इयर ” ठरले.

तर, सर्वाधिक लाइक झालेले ट्विट हे क्रिकेटपटू विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांना यावर्षी कन्यारत्न प्राप्त झाले, तेव्हाचे होते. याबाबतची ट्विट त्यांनी विराटने ११ जानेवारी २०२१ रोजी केली. या ट्विटला ट्विटला सर्वाधिक पाच लाख ४० हजार लाइक्स मिळाले. त्याशिवाय, गेल्या वर्षी अनुष्का गर्भवती असल्याबाबत केलेल्या विराटच्या ट्विटला २०२० मध्ये सर्वाधिक लाइक्स मिळाले होते.

हे ही वाचा:

शरद पवार वाचणार स्वातंत्र्यवीर सावरकरांचे चरित्र!

महाराष्ट्रात आता बैल धावणार

बैलगाडा शर्यती पुन्हा सुरू झाल्यामुळे हाताला काम मिळेल!

अनिल परबांच्या सुरक्षेसाठी पोलिसांचे अर्धशतक!

 

तसेच, सरकार क्षेत्रात सर्वाधिक रिट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोविड प्रतिबंधात्मक लशीचा पहिला डोस घेतल्याबाबत केलेले ट्विट हे सरकारक्षेत्रातील सर्वाधिक रिट्विट मिळवणारे ट्विट ठरले. त्यांच्या या ट्विटला ४५ हजार रिट्विट मिळाले. त्याशिवाय सर्वाधिक लाइक्स सुद्धा मोदी यांनी भारतीय क्रिकेट संघाने मिळवलेल्या विजयाबाबत केलेल्या कौतुकाला दोन लाख २६ हजार लाइक्स मिळाले.

त्याचप्रमाणे उद्योग क्षेत्रात सत्तर वर्षांनंतर पुन्हा एकदा एअर इंडिया टाटांकडे परत आल्यानंतर उद्योगपती रतन टाटा यांच्या त्या ट्विटला सर्वाधिक रिट्विट व लाइक्स मिळाले. मनोरंजन क्षेत्रातिल सर्वाधिक रिट्विट व लाइक्स अभिनेता विजय त्याच्या बिस्ट या चित्रपटाच्या फर्स्ट लूकला मिळाले. तसेच, क्रीडा क्षेत्रात विराट कोहलीच्या ट्विटला सर्वाधिक रिट्विट व लाइक्स मिळाले

Exit mobile version