देशात कोविडचा प्रभाव वाढत आहे. सध्या देशातील रुग्णांसाठी ऑक्सिजनची कमतरता हा कळीचा प्रश्न बनलेला आहे. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोविडच्या रुग्णांसाठी द्रवरूप ऑक्सिजन ऐवजी वायूरुप ऑक्सिजनचा वापर करता येईल का या संदर्भात एक बैठक घेतली.
या बाबत स्वतः मोदी यांनी ट्वीट केले होते. या ट्वीटमध्ये त्यांनी एका प्रसिद्धी पत्रकाची लिंक देखील दिली होती. या संदर्भातल्या या पत्रकानुसार मोदींच्या अध्यक्षतेखाली या संदर्भातील एक बैठक पार पडली. अनेक उद्योगांत उदा. स्टील प्लांट, ऊर्जा निर्मिती केंद्रे येथे वायूरूप ऑक्सिजनचा वापर केला जातो. त्यांच्याकडे वायूरुप ऑक्सिजन निर्माण करणारे स्वतंत्र भाग देखील असतात. त्यांचा वापर कोविडच्या रुग्णांसाठी केला जाऊ शकतो का यावर या बैठकीत विचार करण्यात आला.
Took stock of the usage of gaseous oxygen produced by industry, for medical purposes, with adjacent temporary hospitals. https://t.co/puuRr1BaBG
— Narendra Modi (@narendramodi) May 2, 2021
हे ही वाचा:
राष्ट्रवादी, शिवसेनेला दुसऱ्याच्या लग्नात नाचायची सवय!
निवडणुक आयोग विजय मिरवणुकांवर नाराज
भाजपाचे आवताडे महाविकास आघाडीवर भारी
ऑक्सिजनच्या परिवहनासाठी महिंद्रांकडून प्रयत्न
त्यासाठी असे कारखाने, उद्योग शोधून, त्यापैकी लोकसंख्येची घनता अधिक असलेल्या अथवा शहरी भागाच्या जवळ असलेल्या कारखान्यांना शोधून त्यांच्या ऑक्सिजन निर्मितीच्या केंद्रापासून नजीकच्या जागी ऑक्सिजनची सुविधा असलेल्या तात्पुरत्या कोविड केंद्रांची निर्मीती करण्याची योजना मांडली गेली. अशा प्रकारची पाच केंद्रे यापूर्वीच चालू करण्यात आली असून त्याला उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे देखील या पत्रकात म्हटले आहे. या धर्तीवर अजून १०,००० खाटांची निर्मिती शक्य असल्याचे देखील या पत्रकात म्हटले आहे. त्यासाठी सर्व राज्य सरकारांना या प्रकारच्या खाटांची निर्मिती करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले आहे.
पंतप्रधानांचे प्रधान सचिव, मंत्रीमंडळाचे सचिव, गृहखात्याचे सचिव इत्यादींसह प्रशासनातील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांची या बैठकीला उपस्थिती लावली होती.