मोदींनी घेतला लसीचा दुसरा डोस

भारतात कोविड विरुद्धची लसीकरण मोहीम जोरात चालू आहे. खुद्द पंतप्रधानांनी देखील आज लसीचा दुसरा डोस घेतला. पात्र नागरीकांना लसीकरण करून घेण्याचे आवाहन देखील केले.

मोदींनी घेतला लसीचा दुसरा डोस

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कोविड लसीचा दुसरा डोस घेतला. दिल्लीतील एम्स रुग्णालयात जाऊन त्यांनी आज सकाळी डोस घेतला याबाबत त्यांनी ट्वीट देखील केले आहे.

आज सकाळी दुसरा डोस घेतानाचा फोटो मोदींनी ट्वीट केला होता. यामध्ये ते म्हणतात, “आज एम्समध्ये कोविड-१९चा दुसरा डोस घेतला. या विषाणुला हरवण्यासाठी थोडे मार्ग उपलब्ध आहेत त्यापैकी लस एक आहे. जर तुम्ही लस घ्यायला पात्र असाल तर लगेच लस घ्या. कोविनवर नोंदणी करा.”

हे ही वाचा:

लसीच्या तुटवड्याचा ठाकरे सरकारचा दावा धादांत असत्य

महाराष्ट्र सरकारने लसीचे राजकारण करू नये

महाराष्ट्रात कोरोनाचा विस्फोट सुरूच

नरेंद्र मोदी यांनी एम्स रुग्णालयातच कोविडच्या लसीचा पहिला डोस १ मार्च रोजी घेतला होता. त्यांनी भारत बायोटेकने निर्माण केलेल्या कोवॅक्सिन लसीचा डोस घेतला होता.

काल महाराष्ट्रात शरद पवारांनी देखील आपल्या निवासस्थानी दुसरा डोस घेतला होता. मोदीं पाठोपाठ बहुसंख्य नेत्यांनी त्यांचा पहिला डोस घेतला होता.

जगातिल सर्वात मोठी लसीकरण मोहीम राबवत आहे. १६ जानेवारीपासून या मोहिमेला सुरूवात झाली आणि १ एप्रिल रोजी या मोहीमेच्या तिसऱ्या टप्प्याला देखील सुरूवात झाली. या टप्प्यात ४५ वर्षांवरील सर्व नागरीकांना सरसकट लस देण्यात येण्यात आहे.

या लसीकरण मोहीमेअंतर्गत सुमारे ६ कोटी लोकांना आत्तापर्यंत किमान एक डोस देण्यात आला आहे आणि सुमारे १ कोटी लोकांना लसीचा दुसरा डोस देखील देण्यात आला आहे.

Exit mobile version