पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ओदिशात जाऊन घेतला अपघातस्थळाचा आढावा

बालासोर जिल्ह्यातील रुग्णालयातही त्यांनी जखमींची विचारपूस केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ओदिशात जाऊन घेतला अपघातस्थळाचा आढावा

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओदिशात बालासोर येथे झालेल्या रेल्वे अपघातस्थळी भेट दिली आणि परिस्थितीची माहिती करून घेतली. कटक येथील रुग्णालयात जाऊन त्यांनी जखमींची विचारपूसही केली.

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यासह पंतप्रधान अपघातस्थळी फिरून परिस्थितीची माहिती करून घेत होते.

बालासोर जिल्ह्यातचील बहानगा येथे हा अपघात घडला. त्यात २८० लोक आतापर्यंत मृत्युमुखी पडल्याची माहिती मिळत आहे. त्यानंतर पंतप्रधानांनी या अपघाताचे गांभीर्य ओळखून घटनास्थळाला भेट दिली. हवाई दलाच्या हेलिकॉप्टरने पंतप्रधान तिथे पोहोचले. बालासोर जिल्ह्यातील रुग्णालयातही त्यांनी जखमींची विचारपूस केली.

त्याआधी, पंतप्रधानांनी सकाळी परिस्थितीची माहिती करून घेण्यासाठी खास बैठक बोलावली. या घटनेत कोरोमंडल एक्स्प्रेस ही बंगळुरू एक्स्प्रेस आणि एका मालगाडीला धडकल्यामुळे अडीचशेपेक्षा अधिक लोकांना प्राण गमवावे लागले आहेत.

शुक्रवारी सायंकाळी बालासोर येथे हा अपघात घडला. बेंगळुरू हावरा सुपरफास्ट एक्स्प्रेस, शालिमार चेन्नई सेंट्रल कोरोमंडल एक्स्प्रेस आणि मालगाडीत ही टक्कर झाली.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही ओदिशाला भेट दिली आणि परिस्थितीची माहिती करून घेतली. ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनीही बालासोरला भेट दिली आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासह परिस्थितीची माहिती करून घेतली.

हे ही वाचा:

अमित शहांनी इशारा दिल्यानंतर मणिपूरचे बंडखोर आले शरण, १४० शस्त्रे परत

मुंबईत तामिळनाडूच्या हिरे व्यापाऱ्याला लुटणारी टोळी जेरबंद

ओडिशा रेल्वे अपघातात आतापर्यंत २६१ जणांचा मृत्यू

साक्षी हत्याकांड एकमेव नव्हे लव्ह जिहादची काळी छाया अनेक शहरांवर

या अपघातानंतर बचावकार्य आता संपुष्टात आले आहे. आता रेल्वेमार्ग मोकळा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे पुन्हा एकदा इथे रेल्वेमार्ग खुले होतील.

या तीनपैकी दोन प्रवासी रेल्वेतून जवळपास ३४०० प्रवासी प्रवास करत होते. आता रेल्वेमंत्र्यांनी घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. मृतांच्या नातेवाईकांना १० लाख तर जखमींना २ लाखांची मदत देण्यात येणार आहे.

Exit mobile version