संसदेच्या नव्या भवनाच्या उद्घाटन सोहळ्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून होती. पण हा सोहळा स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीदिनी आयोजित करण्यात आला याला वेगळे महत्त्व होते.
हे ही वाचा:
विरोधकांना आझादांनी दाखविला आरसा
पंतप्रधान आज नव्या संसद भवनाचे करणार लोकार्पण
पीएफआयवरील बंदीच्या रागातून गडकरींना केले ‘टार्गेट’
असा झाला मंत्रोच्चारांच्या निनादात दिमाखदार सेंगोल प्रतिष्ठापना सोहळा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सावरकरांच्या प्रतिमेला वंदन करण्यात आले. फुलांनी सजविलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रतिमेसमोर नरेंद्र मोदी नतमस्तक झाले. त्यानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांनीही फुले अर्पण करून सावरकरांना वंदन केले. इतर खासदारांनीही फुले वाहून सावरकरांना वंदन केले. त्यात भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डाही उपस्थित होते.