एनडीएचे प्रमुख नेते नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेत सरकार स्थापन करण्याचा दावा केला आहे.मोदींनी आपल्या समर्थक खासदारांच्या सह्याचं पत्र राष्ट्रपतींकडे सादर केले आहे.तसेच ९ जूनला होणाऱ्या शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण राष्ट्रपतींना दिलं आहे.
राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) नवनिर्वाचित खासदारांची आज संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये बैठर पार पडली.मंत्रिमंडळ स्थापनेच्या तयारीवर चर्चा करण्यासाठी ही बैठक पार पडली.या बैठकीला एनडीएतील सर्व खासदार आणि राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थित होते.या बैठकीमध्ये सर्वांच्या सहमताने एनडीएचा प्रमुख नेता म्हणून नरेंद्र मोदींची निवड करण्यात आली.
हे ही वाचा:
‘ईव्हीएम’ जिवंत आहे की मेली?, मोदींचा इंडी आघाडीवर निशाणा!
एनडीएच्या बैठकीत नरेंद्र मोदी संविधानापुढे झाले नतमस्तक!
पाकिस्तानविरोधातील अमेरिकेच्या विजयाचा शिल्पकार; सौरभ नेत्रावलकर आहे तरी कोण?
टी२० विश्वचषक स्पर्धेत अमेरिकेकडून पाकिस्तानला पराभवाचा धक्का!
या निवडीनंतर मोदी राष्ट्रपतींच्या भेटीसाठी राष्ट्रपती भवनात दाखल होऊन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेत त्यांनी आपल्या समर्थक खासदारांच्या सह्याचं पत्र त्यांच्याकडे सादर करून सरकार स्थापनेचा दावा केला.तसेच ९ जूनला होणाऱ्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी निमंत्रण दिलं.यानंतर मोदींनी राष्ट्रपती भवन येथून जनतेला संबोधित केलं.
ते म्हणाले की, जनतेने मला तिसऱ्यांदा देशाची सेवा करण्याची संधी दिली यासाठी मी त्यांचे आभार मानतो.गेल्या १० वर्षांप्रमाणे या वेळीही देशवासीय निराश होणार नसल्याचे ते म्हणाले.पूर्वीच्या एनडीए सरकारंप्रमाणेच हे सरकार ५ वर्षे चालणार आहे, असे मोदी म्हणाले.दरम्यान, नरेंद्र मोदी ९ जूनला (रविवार) संध्याकाळी ६ वाजता तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत.