पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरात येथील इन्वेस्टमेंट समिटमध्ये बोलताना भारतात व्हेहिकल स्क्रॅपेज पॉलिसीची (जुन्या गाड्या भंगारात काढण्याविषयीचे धोरण) घोषणा केली आहे. यामुळे देशाला होणारे विविध फायदे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहेत.
यावेळी बोलताना नरेंद्र मोदी यांनी या योजनेचे फायदे देखील समजावून दिले आहेत. ते म्हणाले आहेत की, या योजनेअंतर्गत जुनी गाडी भंगारात काढल्यास त्या व्यक्तील एक प्रमाणपत्र मिळणार आहे. या प्रमाणपत्राच्या सहाय्याने नवी गाडी खरेदी करण्यावर नोंदणी शुल्क आकारण्यात येणार नाही. त्याबरोबरच त्या व्यक्तीला रोड टॅक्समधून देखील सूट देण्यात येणार आहे.
हे ही वाचा:
कंदहार पडले, तालिबानची राजवट अटळ?
लॉर्ड्स कसोटीचा पहिला दिवस भारताच्या नावावर
दोन लसी घेतलेल्यांचे ‘तिकीट कापले’
त्याबरोबरच त्यांनी हे देखील सांगितले की जुन्या गाडीच्या देखभालीचा आणि दुरूस्तीचा खर्च, त्याबरोबरच इंधनावर होणारा खर्च देखील वाचणार आहे. रस्ते सुरक्षेच्या दृष्टीने देखील जुन्या गाड्या उपयुक्त नसल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. जुन्या गाड्यांतील जुन्या तंत्रज्ञानामुळे अपघात होण्याची शक्यता जास्त असते.
नरेंद्र मोदी यांनी यावेळी बोलताना अर्थव्यवस्थेला होणारा फायदा देखील विषद करून सांगितला. देशाच्या शहरांतील प्रदुषण कमी होण्याबरोबरच विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे देखील यातून दिसून येणार असल्याचे त्यांना सांगितले. यावेळी त्यांनी सर्क्युलर इकॉनॉमीचा देखील उल्लेख केला होता.