जनता दल (युनायटेड) च्या लोकसभेच्या खासदाराने पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले आहे आणि ‘ मोदी है तो मुमकीन है ‘ (मोदी असतील तर शक्य आहे) असा नारा देखील दिला.या वक्तव्यानंतर बिहारमध्ये वाद निर्माण झाला आहे.
सीतामढी लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे सुनील कुमार पिंटू यांनी मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये भाजपने दणदणीत विजय मिळवल्यानंतर ही टिप्पणी केली. भाजपने राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसला सत्तेपासून दूर केले.सुनील कुमार पिंटू म्हणाले की, “निवडणुकीचे निकाल पाहता, ‘ मोदी है तो मुमकिन है ‘ हे दिसून येते. भाजपकडून विधानसभा निवडणुकीत हा नारा देण्यात आला होता, असे सुनील कुमार पिंटू म्हणाले.
हे ही वाचा:
महाराजा यशवंतराव होळकर यांचे मुंबईत स्मारक उभारणार
राष्ट्रीय स्मारकासाठी पुण्यातील भिडेवाडा इतिहासजमा
२६/११ मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड साजिद मीरवर तुरुंगात विषप्रयोग
राज्यात ७५ ठिकाणी नाट्यगृह उभारणीसाठी ३८६ कोटींचा निधी देणार
सुनील कुमार पिंटू यांच्या वक्तव्यानंतर जेडीयूकडून प्रत्युतर दिले जात आहे.पक्षाचे प्रवक्ते नीरज कुमार म्हणाले की, सुनील कुमार पिंटू यांच्यावर पंतप्रधान मोदींचा प्रभाव असल्यास त्यांनी लोकसभा खासदारकीचा राजीनामा द्यावा, अशी मागणी नीरज कुमार यांनी केली.”जर मोदींचा इतका प्रभाव असेल तर त्यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी संसदेचा राजीनामा द्यावा. त्यांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा,” असे कुमार म्हणाले.
तर दुसरीकडे भाजपचे प्रवक्ते कुंतल कृष्णा यांनी पिंटूच्या वक्तव्याचे समर्थन केले आहे.ते म्हणाले, सुनील कुमार पिंटू यांनी ‘मोदी है तो मुमकिन है’ हा नारा दिला, तो बरोबर आहे कारण सध्याची परिस्थिती तशी आहे आणि हे सर्व लोकांना समजत आहे.