मोदी सरकारचे खातेवाटप जाहीर!

राजनाथ सिंग, गडकरी, अमित शाह, निर्मला सीतारामण यांच्याकडे पूर्वीचीच खाती कायम

मोदी सरकारचे खातेवाटप जाहीर!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचा रविवारी शपथविधी पार पडला. आज पंतप्रधान मोदी यांनी आपला कार्यभार स्वीकारून कार्याला सुरुवात केली आहे. दरम्यान आज सायंकाळी शपथ घेतलेल्या मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर करण्यात आले. भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह, राजनाथ सिंह, नितीन गडकरी, अश्विनी वैश्णव, एस. जयशंकर, निर्मला सीतारामण यांच्याकडे पूर्वीचीच खाती ठेवण्यात आली आहेत.

आज सायंकाळी पंतप्रधान कार्यालयाकडून खातेवाटप जाहीर करण्यात आले. तत्पूर्वी नव्या मंत्रीमंडळाची बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत त्यांनी नवनिर्वाचित मंत्र्यांना सुचना केल्या. नव्याने शपथ घेतलेल्या मंत्र्यांना कोणती खाती मिळणार याबद्दल उत्सुकता होती.

हे ही वाचा:

एमसीएचे अध्यक्ष अमोल काळेंचे न्यूयॉर्कमध्ये निधन!

बेटकुळ्या दाखवणाऱ्यांना महायुतीचे नेते वेसण घालतील काय?

मुंबई विमानतळावर १९ कोटींचे सोने जप्त; दोन परदेशी महिलांना अटक

भारत- पाक सामन्यात रोहित शर्माने भारतीय संघाचे वाढवले मनोधैर्य

महाराष्ट्रातील सहा खासदारांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे. नितीन गडकरी, पियुष गोयल आणि रामदास आठवले वगळता अन्य तिघे म्हणजे रक्षा खडसे, मुरलीधर मोहोळ आणि प्रतापराव जाधव हे नव्याने झालेले मंत्री आहेत. यामध्ये पियुष गोयल यांच्याकडे वाणिज्य, आठवले यांच्याकडे सामाजिक न्याय, मोहोळ यांच्याकडे नागरी उड्डाण राज्यमंत्री आणि रक्षा खडसे यांनी युवक आणि क्रीडा विभागाचा कार्यभार देण्यात आला आहे.

आज खातेवाटप जाहीर झाल्यानंतर उद्यापासून हे सर्व मंत्री आपल्या मंत्रालयाचा कारभार सुरु करतील. भाजप बरोबर एनडीएमध्ये सहभागी झालेली सर्व घटक पक्षांना मंत्रीमंडळात स्थान देण्यात आले आहे. महाराष्ट्रातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अद्याप मंत्रीपद देण्यात आलेले नाही. मात्र मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळेल, अशी माहिती कालच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते. मंत्रिमंडळात ३० जणांना कॅबिनेट, पाच जण स्वतंत्र कार्यभार असलेले राज्यमंत्री आणि ३६ जणांचा राज्यमंत्री म्हणून समावेश करण्यात आला आहे.

Exit mobile version