एम्स आता ओळखले जाणार ‘या’ नावाने

मोदी सरकारने तयार केला प्रस्ताव

एम्स आता ओळखले जाणार ‘या’ नावाने

मोदी सरकारने देशभरातील सर्व २३ एम्सना विशिष्ट नावे देण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. केंद्र सरकारच्या या प्रस्तावात प्रादेशिक वीर, स्वातंत्र्यसैनिक, ऐतिहासिक घटना किंवा त्या प्रदेशातील स्मारके किंवा त्यांची विशिष्ट भौगोलिक ओळख यांच्या आधारावर दिल्लीसह सर्व एम्सला खास नावे देण्याची योजना आहे.

मोदी सरकारच्या या निर्णयात केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयसुद्धा सक्रिय आहे. मंत्रालयाने नावांबाबत २३ ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) कडून सूचना मागवल्या होत्या. त्यानंतर बहुतेक एम्स संस्थांनी नावांची यादी सादर केली आहे.

सध्या एम्स हे देशात त्याच्या सामान्य नावाने ओळखले जाते. या संस्था फक्त त्यांच्या स्थानावरून म्हणजेच दिल्ली एम्स अशा प्रकारे ओळखल्या जातात.त्यामुळे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व २३ एम्सना विशिष्ट नावे देण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. यामध्ये पूर्णपणे कार्यरत, अंशतः कार्यरत किंवा बांधकामाधीन एम्सचा समावेश आहे.

हे ही वाचा:

इकबाल कासकरच्या बॉडीगार्डला मारणाऱ्या फरार आरोपीच्या आवळल्या मुसक्या

“उद्धव ठाकरेंनी शिवाजी महाराजांसारखा तह करायला हवा होता”

सिसोदियांसह १३ जणांविरुद्ध लुकआऊट नोटीस जारी

बांदीपोरामधून एका दहशतवाद्याच्या आवळल्या मुसक्या

त्यासाठी विविध एम्स संस्थांकडून विशिष्ट नावांच्या सूचना मागविण्यात आल्या असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. संस्थांना ठळकपणे स्थानिक किंवा प्रादेशिक वीर, स्वातंत्र्यसैनिक, संस्था असलेल्या क्षेत्राची विशिष्ट भौगोलिक ओळख आणि परिसरातील प्रमुख ऐतिहासिक घटना किंवा स्मारके यांची नावे देण्यास सांगितले होते. यापैकी बहुतांश प्रमुख आरोग्य संस्थांनी सुचविलेल्या नावांसाठी तीन ते चार नावे सुचवली आहे.

Exit mobile version