अब की बार… नवे मंत्रालय ‘सहकार’

अब की बार… नवे मंत्रालय ‘सहकार’

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा देशभर सुरु असतानाच मोदी सरकारने देशासाठी एक नवे मंत्रालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. मिनिस्ट्री ऑफ को-ऑपरेशन अर्थात सहकार मंत्रालय असे हे नवे मंत्रालय असणार आहे. सहकारातून समृद्धी हे मोदी सरकारचे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी सरकारकडून या नव्या मंत्रालयाची सुरुवात करण्यात आली आहे.

मोदी सरकारचे हे पाऊल एक ऐतिहासिक पाऊल मानले जात आहे. देशाच्या सर्वांगीण विकासात सहकार क्षेत्राचे योगदान खूप मोठे मानले जाते. पण तरीही आजवर या क्षेत्रासाठी स्वतंत्र असे मंत्रालय नव्हते. पण आता मोदी सरकारने निर्णय घेत एक स्वतंत्र मंत्रालय स्थापन केले आहे. या मंत्रालयाच्या माध्यमातून सहकार क्षेत्रासाठी विशेष प्रशासकीय, कायदेशीर आणि धोरणात्मक रचना लावण्यात येणार आहे. यामुळे देशातील सहकार चळवळीला बळकटी मिळणार आहे.

हे ही वाचा:

ऑनलाइन औषधांच्या नावावर फसवणूक करणारी टोळी पकडली

धर्मांतर केलेल्या हजारो हिंदू मुली दुबईच्या शेखला विकल्या का?

ठाकरे सरकारचा अहंकार दुर्योधनासारखाच!

ठाकरे सरकारने मार्शल पाठवून आवाज दाबण्याचा प्रयत्न केला

या नव्या मंत्रालयाच्या माध्यमातून सहकार ही खऱ्या अर्थाने लोकचळवळ म्हणून उभी राहण्यात तसेच तळागाळापर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे. या मंत्रालयाच्या माध्यमातून बहुउद्देशीय सहकारी संस्थांच्या विकासाला चालना मिळणार आहे. तर व्यवसाय सुलभीकरण अर्थात इज ऑफ डुईंग बिझिनेसलाही सहकार्य होणार आहे.

या नव्या मंत्रालयाच्या स्थापनेसाठी केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. या नव्या मंत्रालयामुळे कृषी आणि ग्रामीण भागात समृद्धीची एक नवी पहाट होईल असे अमित शहा यांनी म्हटले आहे.

Exit mobile version