मोदी सरकारकडून इस्रोच्या चांद्रयान- ५ मोहिमेला हिरवा कंदील

२०२७ मध्ये चांद्रयान- ४ मोहिमेची योजना; इस्रोचे प्रमुख व्ही. नारायणन यांनी दिली माहिती

मोदी सरकारकडून इस्रोच्या चांद्रयान- ५ मोहिमेला हिरवा कंदील

भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेचं इस्रोचे प्रमुख व्ही. नारायणन यांनी चांद्रयान- ५ मोहिमेबाबत महत्त्वाचे अपडेट दिले आहेत. केंद्रातील मोदी सरकारने चांद्रयान- ५ मोहिमेला हिरवा कंदील दाखवल्याची महत्त्वाची माहिती इस्रो प्रमुखांनी दिली आहे. त्यामुळे इस्रो आता चांद्रयान- ५ मोहिमेद्वारे चंद्राचा अधिक सखोल अभ्यास करू शकणार आहे. यासंबंधीची माहिती इस्रोच्या एका कार्यक्रमात व्ही. नारायणन यांनी दिली.

इस्रोने चांद्रयान- ३ मोहिमेच्या माध्यमातून इतिहास रचला होता. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहचणारा भारत पहिला देश ठरला होता. यानंतर आता २०२७ मध्ये चांद्रयान- ४ मोहीम राबवण्याचे आयोजन असून त्यापुढील मोहीम म्हणजेच चांद्रयान- ५ ला ही आता मान्यता मिळाली आहे. चांद्रयान- ३ मोहिमेत २५ किलो वजनाचा रोव्हर प्रज्ञान चंद्रावर पाठवण्यात आला होता, तर चांद्रयान- ५ मोहिमेत २५० किलो वजनाचा रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवला जाईल. या माध्यमातून चंद्राच्या पृष्ठभागाचा अभ्यास केला जाणार आहे.

व्ही. नारायणन म्हणाले की, चांद्रयान मोहिमेत चंद्राच्या पृष्ठभागाचा अभ्यास केला जात आहे. २००८ मध्ये चांद्रयान- १ ने चंद्राच्या पृष्ठभागावरील रसायने, खनिजे यशस्वीरित्या शोधून काढली आणि चंद्राचे भू-स्थानिक मॅपिंग देखील केले. चांद्रयान- २ मोहिमेने ९८ टक्के उद्दिष्ट साध्य केले. चांद्रयान- ३ च्या माध्यमातून, यशस्वी लँडिंग आणि रोव्हरद्वारे चंद्राच्या पृष्ठभागाबद्दल माहिती गोळा केली जात आहे. चांद्रयान- २ मोहिमेअंतर्गत पाठवण्यात आलेला रिझोल्यूशन कॅमेरा अजूनही चंद्राचे शेकडो फोटो पाठवत आहे. फक्त तीन दिवसांपूर्वीच आम्हाला चांद्रयान- ५ मोहिमेला मंजुरी मिळाली आहे. आम्ही ते जपानच्या सहकार्याने करणार आहोत, अशी माहिती त्यांनी दिली. तसेच २०२७ मध्ये सुरू होणार्‍या चांद्रयान- ४ मोहिमेचे उद्दिष्ट चंद्रावरून गोळा केलेले नमुने आणणे आहे. इस्रोच्या भविष्यातील प्रकल्पांबद्दल नारायणन म्हणाले की, गगनयानसह विविध मोहिमांव्यतिरिक्त, भारताचे स्वतःचे अंतराळ स्थानक स्थापन करण्याच्या योजना सुरू आहेत.

हेही वाचा..

हिंदूंना जबरदस्तीने ख्रिश्चन धर्मात धर्मांतरित केल्याप्रकरणी चौघांना अटक

जय शिवराय नको अल्ला हू अकबर म्हणा!

एनसीआर : पुढील दोन दिवसांनंतर कमाल आणि किमान तापमान वाढण्यास सुरुवात होणार

जगभरातील दहशतवादी हल्ल्यांचे धागे पाकिस्तानशी जोडलेले असतात

चांद्रयान- ५ मोहिमेत २५० किलो वजनाचा रोव्हर असेल, जो चांद्रयान- ३ मोहिमेत वापरल्या गेलेल्या २५ किलो वजनाच्या ‘प्रज्ञान’ रोव्हरपेक्षा लक्षणीयरीत्या आधुनिक असणार आहे. शिवाय जपानसोबतच्या भागीदारीमुळे मोहिमेच्या वैज्ञानिक क्षमतांमध्ये वाढ होण्याची अपेक्षा आहे.

वेळ आली आहे 'औरंगजेब'ला उखडायचंय! | Mahesh Vichare | Aurangzeb Kabar |

Exit mobile version