कोविडला धोबीपछाड द्यायला मोदी सरकारचा महत्वाचा निर्णय

कोविडला धोबीपछाड द्यायला मोदी सरकारचा महत्वाचा निर्णय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने कोविड व्यवस्थापनासाठी एक महत्वाचा निर्णय घेत आर्थिक पॅकेज जाहीर केले आहे. पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. ‘भारत कोविड आपत्कालीन प्रतिसाद आणि आरोग्य व्यवस्था पॅकेज-टप्पा दोन’ या नावाची नवी योजना सरकारने मंजूर केली असून त्यासाठी तब्बल २३,१२३ कोटी रूपयांचे आर्थिक पॅकेज जाहीर करण्यात आले आहे.

हे ही वाचा:

रझा अकादमीचा जनाबसेनेला दम…मोहम्मद पैगंबर कायदा आणण्यासाठी दबाव

‘या’ देशातल्या विद्यमान राष्ट्रपतींची हत्या

नवे मंत्री अश्विनी वैष्णव पहिल्याच दिवशी ऍक्शन मोडमध्ये

मोदींनी केला २०२४ चा शंखनाद

या योजनेचा मुख्य उद्देश आरोग्य विषयक पायाभूत सुविधांचा विकास तसेच आजार प्रतिबंध, निदान आणि व्यवस्थापन ही आहेत. तर यासोबतच आरोग्य यंत्रणेला योग्य प्रकारे गती देणे ही या योजनेची प्रमुख उद्दिष्टे आहेत. कोविड विरुद्धच्या लढाईला बळकटी देण्यासाठी हे आर्थिक पॅकेज महत्वाचे मानले जात आहे.

गेल्या वर्षी कोविड महामारीच्या पहिल्या लाटेला सामोरे जात असताना पंतप्रधान मोदी यांनी एक म्हत्वाचाच निर्णय घेत आर्थिक पॅकेज जाहीर केले होते. “इंडिया कोविड -19 आपत्कालीन प्रतिसाद आणि आरोग्य यंत्रणा सज्जता पॅकेज” असे या योजनेचे नाव होते. तर या योजनेच्या अंतर्गत तब्बल १५००० कोटींची आर्थिक तरतूद जाहीर करण्यात आली होती. याच योजनेचा आता दुसरा टप्पा घोषित केला गेला आहे आणि हे करताना आर्थिक पॅकेजची रक्कमही वाढवण्यात आली आहे.

Exit mobile version