पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकातील बागलकोट निडवणूक रॅलीला संबोधित करताना २०१९ च्या बालाकोट हवाई हल्ल्याचा संदर्भ दिला आणि म्हणाले की, ‘मोदी कधीही मागून हल्ला करत नाही जे करतो ते सर्व उघडपणे करतो’.ते म्हणाले की, भारताने हवाई हल्ला केल्यानंतर याची प्रथम माहिती पाकिस्तानला दिली होती.पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांना मी फोन लावून हल्ल्याची माहिती देत त्यांचे या हल्ल्यात इतके अतिरेकी मारले गेल्याचे सांगितले.त्यानंतर संपूर्ण जगाला या हल्ल्याची माहिती दिली.पाकिस्तानच्या संरक्षण अधिकाऱ्यांसोबत जो पर्यंत फोनवर चर्चा होत नाही तोपर्यंत मी पत्रकार परिषद थांबवण्यास सांगितले होते, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
कर्नाटकातील बागलकोट येथे सोमवारी(२९ एप्रिल) पंतप्रधान मोदींची सभा पार पडली तेव्हा ते बोलत होते.ते म्हणाले की, पुलवामा हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून आम्ही पाकिस्तानातील बालाकोटमधील त्यांच्या दहशतवादी तळांवर हवाई हल्ला केला होता.या हल्ल्याची माहिती भारतीय लष्कर मीडियाला देणार होते.परंतु मी त्यांना रोखले आणि त्यांना सांगितले की, याची माहिती प्रथमतः पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांना सांगेन.यानंतर तुम्ही मीडियाला याची माहिती द्या.
हे ही वाचा:
शिवसेनेचं ठरलं; उत्तर-पश्चिम मुंबईमधून रवींद्र वायकरांना लोकसभेचे तिकीट
संदेशखाली प्रकरणातील पीडित, भाजपा उमेदवार रेखा पात्रा यांना ‘एक्स-श्रेणी’चे सुरक्षाकवच
राज्यघटनेच्या प्रस्तावनेतून ‘समाजवादी’, ‘धर्मनिरपेक्ष’ शब्द वगळण्याची मागणी
अमित शहांचा बनावट व्हिडिओ: आसाम काँग्रेसच्या वॉर रूमचे समन्वयक रीतम सिंग अटकेत
ते पुढे म्हणाले की, मी त्यांना सुरवातीला फोन केला परंतु त्यांनी उचलला नाही.’मी सुरक्षा दलांना तेव्हा निर्देश दिले होते की, जोपर्यंत मी त्यांच्याशी (पाकिस्तान) संपर्क साधण्यात यशस्वी होत नाही तोपर्यंत बालाकोट हवाई हल्ल्याचा खुलासा करू नये.यानंतर पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांशी संपर्क झाला आणि आम्ही त्यांना हल्ल्याची माहिती दिली.पाकिस्तानला सांगितल्यानंतर रात्री झालेल्या हवाई हल्ल्यांबाबत आम्ही जगासमोर खुलासा केला.’मोदी कोणत्याही गोष्टी लपवत नाही, मागून हल्ला करत नाही, जे काही करतो ते उघडपणे करतो’, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.