देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या गुजरात दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी जामनगरमध्ये अनेक प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी केली. दौऱ्यावर असतानाचा पंतप्रधान मोदींचा एक व्हिडिओ समोर आला आहे. जामनगरमध्ये लोकांचे अभिवादन स्वीकारण्यासाठी पंतप्रधान आपले सुरक्षा कवच तोडून बाहेर आले होते.
पंतप्रधान मोदी हे तीन दिवसीय गुजरात आणि मध्य प्रदेश दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी रॅली काढली होती. रॅलीमध्ये लोकांमध्ये प्रचंड गर्दी जमली होती. त्यामध्ये एक व्यक्ती पंतप्रधान मोदींच्या आई आणि त्यांचा फोटोची फ्रेम घेऊन उभा होता. हे जेव्हा मोदींनी पाहिलं तेव्हा त्या व्यक्तीला भेटण्यासाठी गाडीतून खाली उतरले आणि आपले सुरक्षा कवच सोडून त्याला भेटायला आले. त्या व्यक्तीने मोदींना ती फोटो फ्रेम भेट दिली आणि त्याच्याकडे असलेल्या दुसऱ्या फ्रेमवर मोदींनी सही केली.
#WATCH | PM Narendra Modi got down from his car to accept people’s greetings in Jamnagar, Gujarat earlier this evening. pic.twitter.com/t7iLTOs3eK
— ANI (@ANI) October 10, 2022
मोदींचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतं असून, लोकांकडून अनेक प्रतिक्रिया देत आहेत. सध्या पंतप्रधान गुजरात दौऱ्यावर असून त्यानंतर मध्यप्रदेश दौऱ्यावर जाणार आहेत. येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींचा दौरा महत्वाचा असल्याचं म्हटलं जातं आहे.
हे ही वाचा:
गुगलने कान्होजी आंग्रे यांच्याबाबतीतली ‘ती’ चूक सुधारली
आशिष शेलार उतरले मुंबई क्रिकेट असोशिएशनच्या निवडणुकीच्या मैदानात
ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरेंविरोधात गुन्हा दाखल
चिन्हं, नाव गोठवल्यावरही ठाकरेंचे गद्दार, खोकासूर, मिंधे गट सुरूच
दरम्यान, या दौऱ्यात त्यांनी जनतेला संबोधित केले आहे. यावेळी ते म्हणाले की, मी सरदार साहेबांच्या पावलावर पाऊल ठेवत असल्याने माझ्याकडे पटेलांच्या भूमीची मूल्ये आहेत आणि त्यामुळेच मी काश्मीरचा प्रश्न सोडवला आहे. यावेळी त्यांनी सरदार पटेल यांना श्रद्धांजली वाहिली आहे.