तीराला ‘देव’ पावला

तीराला ‘देव’ पावला

स्पायनल मस्क्युलर अ‌ॅट्रॉफी या दुर्धर आजाराने ग्रासलेल्या चिमुकल्या तीरा कामतच्या मदतीसाठी अनेक हात सरसावले असताना आता राज्य सरकारपाठोपाठ केंद्र सरकारनेही तीराच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. केंद्र सरकाराने तीरासाठी लागणाऱ्या औषधांसाठीचा ६ कोटींचा कर माफ केला आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मदत करण्याची  पत्राद्वारे विनंती केली होती. फडणवीसांच्या या पत्राला मोदींनीही तात्काळ प्रतिसाद देत तीराच्या उपचारासाठी लागणाऱ्या औषधांवरील ६ कोटींचा कर माफ केला आहे.

अपत्य झाल्यानंतर आई-वडिलांना होणारा आनंद कोही औरच असतो. मात्र, मिहिर आणि प्रियांका कामत यांची मुलगी तीरा कामत ही ५ महिन्यांची झाल्यानंतर तिला स्पायनल मस्क्युलर अ‌ॅट्रॉफी हा दुर्धर जडला. तिच्या उपचारासाठी तब्बल १६ कोटी रुपये लागणार होते. त्यासाठी तीराच्या आईवडिलांनी फंडिंगच्या माध्यमातून हा पैसा गोळाही केला. मात्र, तीरासाठी लागणारी औषधं ही अमेरिकेहून येणार असल्यामुळे या औषधांसाठी तब्बल ६ कोटींचा आयातकर द्यावा लागणार होता. एवढी मोठी रक्कम कशी उभी करावी असा प्रश्न तीराच्या आई-वडिलांना पडला होता. तीराच्या आई-वडिलांच्या याच अडचणीची दखल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी घेतली.

ही अडचण लक्षात घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी संवेदनशीलता दाखवत १ फेब्रुवारी रोजी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींन पत्र लिहिले. यामध्ये त्यांनी तिरासाठी लागणाऱ्या औषधांचे सीमाशुल्क माफ करण्याची विनंती केली. मोदींनीही फडणवीस यांच्या विनंतीला मन देऊन सुमाशुल्क माफ करण्याचा आदेश ९ फेब्रुवारी रोजी जारी केला. मोदींच्या तसेच केंद्र सरकारच्या या भूमिकेचे संपूर्ण देशभरातून स्वागत होत आहे.

Exit mobile version