मोदी ३.O चा पहिला निर्णय बळीराजासाठी; किसान सन्मान निधीचा १७ वा हफ्ता जारी

पंतप्रधान पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर नरेंद्र मोदींकडून किसान सन्मान निधीच्या फाईलवर स्वाक्षरी

मोदी ३.O चा पहिला निर्णय बळीराजासाठी; किसान सन्मान निधीचा १७ वा हफ्ता जारी

देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत नरेंद्र मोदी यांनी रविवार, ९ जून रोजी पंतप्रधान म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. यानंतर त्यांनी सोमवार, १० जून रोजी नवी दिल्लीत पंतप्रधानपदाचा कार्यभार स्वीकारला. कार्यभार स्वीकारल्यानंतर नरेंद्र मोदी हे थेट कामाला लागले असून त्यांनी लगेचच मोठा निर्णय घेतला आहे. पहिला त्यांचा निर्णय त्यांनी शेतकऱ्यांसाठी घेतला आहे. त्यांनी किसान सन्मान निधीच्या फाईलवर स्वाक्षरी केली आहे. यामुळे किसान सन्मान निधीचा १७ वा हफ्ता जारी झाला आहे.

तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी पहिला मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णय बळीराजाच्या हिताचा आहे. पीएम किसान निधीचा १७ वा हप्ता जारी झाला आहे. नरेंद्र मोदींनी किसान सन्मान निधीच्या फाईलवर स्वाक्षरी केली आहे. याचा फायदा ९.३ कोटी शेतकऱ्यांना होणार आहे. यासाठी २०,००० कोटींचा खर्च सरकारला आला आहे. दोन हजार रुपयांचा हा हप्ता देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला आहे.

हे ही वाचा:

बिहार, बंगाल, मध्यप्रदेशसह ७ राज्यांच्या १३ विधानसभा जागांवर होणार पोटनिवडणुका!

पाकच्या टीआरएफ दहशतवादी गटाने स्वीकारली जम्मू-काश्मीर बस हल्ल्याची जबाबदारी!

मोदी तिसऱ्यांदा निवडून आल्यास मुंडन करण्याच्या विधानावरून ‘आप’चे नेते सोमनाथ भारती यांचा यु-टर्न

दहशतवाद्यांनी २० मिनिटे गोळीबार केला आणि…. जखमी यात्रेकरुंनी सांगितलं नेमकं काय घडलं?

नरेंद्र मोदी यांनी रविवारी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. यावेळी त्यांच्यासोबत ७१ मंत्र्यांनी पदाची शपथ घेतली आहे. त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी नरेंद्र मोदींनी पंतप्रधान पदाचा पदभार स्विकारला. यानंतर ते तातडीने कामाला लागेल आहेत. देशाच्या इतिहासात फक्त पंडित जवाहरलाल नेहरु हे सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले आहेत. त्यांच्या विक्रमाची बरोबरी नरेंद्र मोदी यांनी केली आहे. नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी झालेल्या सभांमध्येचं स्पष्ट केलं होतं की, त्यांच्याकडे सरकार स्थापनेनंतरच्या १०० दिवसांचा रोड मॅप तयार आहे. त्यामुळे सत्ता हातात येताच नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या नव्या मंत्रिमंडळालाही काम करण्याचे निर्देश देत स्वतः कामाला सुरुवात केली आहे.

Exit mobile version