युपीच्या संभल दंगलीत दगडफेक करणाऱ्या शंभरहून अधिक हल्लेखोरांची ओळख पटली आहे. आरोपींवर आता योगी सरकार कडक कारवाई करणार आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उच्चस्तरीय आढाव बैठकीत याबाबत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.
लवरकरच आरोपींचे पोस्टर सार्वजनिक ठिकाणी लावण्यात येणार आहेत. सार्वजनिक मालमत्तेची नुकसान भरपाई हल्लेखोरांकडून वसूल केले जाणार आहे. योगी सरकारने तसा अध्यादेश जारी केला आहे. फरार आरोपींवर बक्षीस जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती आहे. या प्रकरणी आतापर्यंत २७ जणांना अटक करण्यात आली आहे. प्रशासनाकडून हिंसाचाराचा अहवाल सरकारला पाठवण्यात आला आहे. यामध्ये संपूर्ण घटनेचा समावेश आहे.
मशिदीच्या सर्वेक्षणादरम्यान झालेल्या हिंसाचारात चार जणांचा मृत्यू झाला तर अनेक पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचारी जखमी झाले. या प्रकरणी आतापर्यंत १०० जणांची ओळख पटली आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत. दरम्यान, संभलमध्ये परिस्थिती नियंत्रणात असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. शाळा, दुकाने सुरु झाली आहे. परंतु, नेट सेवा अद्याप बंद आहे.
हे ही वाचा :
बांगलादेशात साधू चिन्मय प्रभूंच्या अटकेविरोधातील निदर्शनात वकिलाचा मृत्यू!
कुस्तीपटू बजरंग पुनिया चार वर्षांसाठी निलंबित!
मुस्लिम मते जिथे जिथे, उबाठाचा विजय तिथे तिथे!