हरियाणातील नूह येथे झालेल्या जातीय हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर तणावपूर्ण परिस्थिती असल्याने नूह, फरिदाबाद आणि पलवल या तीन जिल्ह्यांमध्ये ५ ऑगस्टपर्यंत मोबाईल इंटरनेट सेवा बंद ठेवण्याचा निर्णय हरियाणा सरकारने घेतला आहे.
‘शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी नूह, फरिदाबाद आणि पलवल जिल्हे तसेच, सोहना, पतौडी आणि गुरुग्राम जिल्ह्यातील मानेसर-उपविभागीय भागांत मोबाइल इंटरनेट ५ ऑगस्टपर्यंत बंद राहतील,’ असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
‘मोबाइल फोन आणि एसएमएस यांसारख्या विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, जसे की व्हॉट्सअॅप, फेसबुक ट्विटर, इत्यादींद्वारे चुकीची माहिती आणि अफवा पसरवण्यास अटकाव केला जावा. तसेच, आंदोलक आणि निदर्शकांनी एकत्र जमून गंभीर जीवितहानी होऊ नये; जाळपोळ किंवा तोडफोड आणि इतर प्रकारच्या हिंसक कारवाया होऊन सार्वजनिक आणि खासगी मालमत्तेचे नुकसान होऊ नये, यासाठी हरियाणाच्या गृह सचिवांच्या आदेशाने मोबाइल इंटरनेट सेवा निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत,’ असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
हे ही वाचा:
अंदमान बेटांवर बसले भूकंपाचे धक्के
चित्त्यांबाबत चिंता वाटणारे पत्र आपण लिहिलेच नाही! तज्ज्ञांचे स्पष्टीकरण
पुण्यातून पावणेदोन कोटी रुपये किंमतीचे अफीम जप्त
चेतन सिंहच्या मानसिक विकाराच्या दाव्यावर पोलिसांना संशय
हरियाणाने नूह संघर्षांच्या पार्श्वभूमीवर अलीकडील सोशल मीडिया पोस्ट तपासण्यासाठी तीन सदस्यीय समिती स्थापन केली आहे. गृहमंत्री अनिल विज यांनी नुकत्याच झालेल्या जातीय संघर्षांना खतपाणी घालण्यात अशा व्यासपीठांनी बजावलेल्या ‘महत्त्वाच्या भूमिके’ला लक्ष्य केले.
जिल्ह्यातून जाणाऱ्या धार्मिक मिरवणुकीवर सोमवारी दुपारी नूँह येथे दोन गटांमध्ये हाणामारी झाली, ज्यात दोन होमगार्ड, एका इमामासह सहा जण ठार झाले. त्यानंतर झालेल्या हिंसाचारात सुमारे २० पोलिसांसह डझनभर लोक जखमी झाले.
या वादानंतर मुख्यमंत्री खट्टर यांनी पीडितांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळेल, असे आश्वासन दिले होते. जे निर्दोष आहेत, त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जाणार नाही. मात्र नूह हिंसाचारात दोषी आढळल्यास त्यांच्यावर कठोर आणि निर्णायक कारवाई केली जाईल. कुणालाही सोडले जाणार नाही. पीडितांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना न्याय दिला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.