मराठी भाषेवरून गुंदेचा हायस्कूलला मनसेचा दणका !

द्वितीय भाषा मराठी प्राप्ती करण्याच्या, मिलिंद घाग यांच्या मागणीला यश

मराठी भाषेवरून गुंदेचा हायस्कूलला मनसेचा दणका !

गुंदेच्या शालेय प्रशासनाकडे द्वितीय भाषा मराठी प्राप्त होण्यासाठी व पालकांच्या इतरही मागण्या मनविसे तर्फे मांडण्यात आल्या होत्या. शालेय प्रशासना सोबत झालेल्या मिटिंग मध्ये सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या व तातडीने अंमल बजावणी करण्याचे आश्वासन शाळेकडून मिळाले असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे उपाध्यक्ष मिलिंद तुकाराम घाग यांनी सांगितले.गुंदेचा एज्युकेशन अकादमी मध्ये शिकणाऱ्या विधार्थ्यांच्या पालकांनी मिलिंद घाग यांच्याशी संपर्क साधत मराठी भाषा विषयाच्या व्यथा मांडल्या होत्या त्यानंतर काही दिवसानंतर मिलिंद घाग यांनी गुंदेच्या शालेय प्रशासनाकडे द्वितीय भाषा मराठी विषयाचा पर्याय शाळेकडून मिळण्याबाबत एक पत्र पाठवले आणि त्यानंतर शालेय प्रशासनाने पालकांच्या मागण्या मान्य करत अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले.

गुंदेच्या शालेय अकादमी मधला विषय असा होता की, आय.सी.एस.ई मंडळ सर्वच विद्यार्थ्यांना द्वितीय भाषा म्हणून मराठी भाषा हा पर्याय होता. त्याप्रमाणे पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी मराठी भाषा शिकली. परंतु शाळा प्रशासनाने २०२०-२०२१ या शैक्षणिक वर्षात एन.ई.पी व अनिवार्य मराठीचे कारण देत द्वितीय भाषेचा पर्याय एकतर्फी बंद करून अनिवार्य मराठीचा अभ्यासक्रम (लोवर लेव्हल मराठी)सुरू केला त्यामुळे जरी म्हणायला तीन भाषा असल्या तरी हिंदी भाषेचा स्तर अत्यंत कठीण व मराठी भाषेचा स्तर मात्र अत्यंत निम्न दर्जाचा असा अभ्यासक्रम सुरू झाला. महाराष्ट्र सरकारचा अनिवार्य मराठीचा कायदा अस्तित्वात आल्याने हा निर्णय पालक व विद्यार्थ्यांनी ना इलाजाने स्वीकारलाही परंतु आता महाराष्ट्र शासनाने मराठी भाषेचे मूल्यांकन शालेय स्तरावर श्रेणी देऊन व या गुणांचा समावेश त्यांच्या इतर गुणांमध्ये न करण्याचा आदेश दिला आहे.

हे ही वाचा:

काँग्रेसची बैठक आटोपून नाना पटोले निघाल्यावर कार्यकर्त्यांमध्ये फ्रीस्टाइल हाणामारी

साक्षी मलिक ही काँग्रेसच्या हातातील बाहुले! कुस्तीगीरांमध्ये जुंपली

चिनी कंपनीचा नवा नियम; ‘विवाहबाह्य संबंध ठेवल्यास नोकरी गमवाल’

परीक्षेलाही बुरखा घालू द्या, म्हणत तेलंगणात मुलींकडून निषेध!

इयत्ता पहिली ते सातवी मराठी भाषा शिकल्यानंतर त्यांना आता हिंदी भाषा शिकण्यास जड जात आहे व द्वितीय भाषेचा मराठीचा पर्याय शाळा देत नसल्याने त्यांना आता बोर्डाच्या परीक्षेत हिंदी भाषेचा पेपर सोडवावा लागणार आहे. त्यामुळे पाल्याच्या एकत्रित गुणांवर त्याचा परिणाम होणार आहे. द्वितीय भाषा मराठी घेतल्यावर अनिवार्य मराठी व तिसरी भाषा हिंदी अशी सक्ती आपली शाळा करत आहे व या सर्व परीक्षा द्याव्या लागतील असे आपल्या शाळेकडून सुचित करण्यात आले आहे. म्हणजे हे अन्यायकारक आहे तरी आपल्या शालेय प्रशासनाकडे पालकांच्या वतीने आमची मागणी आहे की शाळेने विद्यार्थ्यांना द्वितीय भाषा मराठीचा पर्याय द्यावा अनिवार्य मराठी ही शिकण्यास त्याची काही हरकत नाही परंतु हिंदी भाषेची शक्ती मात्र करू नये असे मिलिंद घाग यांनी पत्राद्वारे गुंदेच्या शालेय प्रशासनाकडे मागणी केली होती.

मिलिंद घाग यांच्या प्रयत्नाला यश मिळाले आहे.शालेय प्रशासना सोबत झालेल्या मिटिंग मध्ये सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या व तातडीने अंमल बजावणी करण्याचे आश्वासन शाळेकडून मिळाले असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे उपाध्यक्ष मिलिंद तुकाराम घाग यांनी सांगितले.

 

Exit mobile version