महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही मशिदीवरील भोंग्यांवरून आक्रमक झाली आहे. त्यामुळे सध्या ‘भोंगा’ हा सगळीकडे चर्चेचा विषय बनला आहे. दुसरीकडे आता मनसे नेते आणि चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांच्या हस्ते ‘भोंगा’ या मराठी चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले आहे. त्यानुसार, मनसेक़डून ३ मे रोजी ‘भोंगा’ नावाचा चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे.
‘भोंगा’ हा चित्रपट २०१८ मध्ये तयार करण्यात आला आहे, मात्र चित्रपटगृहात हा चित्रपट प्रदर्शित झाला नव्हता. परंतु, ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपट आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सांगितले होते भोंगा हा विषय धार्मिक नसून सामाजिक आहे. त्याचप्रमाणे अमेय खोपकरही या चित्रपटाच्या पोस्टरच्या अनावरणावेळी याची आठवण करून दिली आहे. ते म्हणाले, हा चित्रपट धार्मिक नसून सामाजिक विषयाशी निगडित आहे.
पुढे अमेय खोपकर म्हणाले की, ” लॉकडाऊनच्या काळात आम्ही चित्रपट प्रदर्शित करणार होतो. मात्र,कोरोनामुळे हा चित्रपट प्रदर्शित करता आला नाही. त्यामुळे हा चित्रपट आता 3 मे रोजी तो प्रदर्शित होणार आहे. भोंगा या चित्रपटातून सामाजिक संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आहे. काही लोकांचे गैरसमज जरी असले तरी, या चित्रपटाच्या माध्यमातून ते दूर होतील. ”
हे ही वाचा:
अबब! मविआच्या मंत्र्यांनी स्वतःवरील उपचारासाठी किती खर्च केला बघा?
सर्वोच्च न्यायालयात सगळेच वकील म्हणाले, जहांगीरपुरीमध्ये अतिक्रमणे!
सदावर्ते पाच दिवस कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात
नवाब मलिकांविरोधात ईडीने दाखल केले दोषारोपपत्र
‘भोंगा’ चित्रपटाची कथा ही अजानवर भाष्य करणारी आहे. चित्रपटातील एका कुटुंबातील चिमुकल्या बाळाला एक प्रकारचा आजार झालेला असतो. अजानच्या भोंग्यामुळे या बाळाच्या तब्येतीवर आणखी परिणाम होत असतो. हा त्रास थांबवण्यासाठी ते कुटुंब नेमके कोणते प्रयत्न करते असे या चित्रपटाचे कथानक आहे. याआधी हा चित्रपट २४ सप्टेंबरला प्रदर्शित होणार होता. मात्र, कोरोनामुळे प्रदर्शन लांबणीवर पडले होते.