बेसुमार जंगलतोडीमुळे पर्यावरणाच्या हानीचा प्रश्न सर्वत्र निर्माण झालेला आहे. अशा परिस्थितीत ही हानी कशी टाळता येईल. पर्यावरणाचे रक्षण कसे करता येईल, या विचारातुन महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने सामाजिक जाणीवेचे भान बाळगत अंत्यसंस्कारासाठी लाकूड वापरण्याऐवजी विद्युत दाहिनीचा वापर केला गेला पाहिजे, असा आग्रह धरला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे बोरिवलीत हिंदू स्मशान भूमी येथे बॅनर लावून अंत्यविधीसाठी विद्युत दाहिनीचा वापर करण्यासाठी नागरिकांना विनंती करण्यात आली आहे.
हे ही वाचा:
मुंबईकर ठरला ‘मुंबई इंडियन्स’चा कर्दनकाळ
मनसेचे राज्य उपाध्यक्ष मिलिंद (बंटी) घाग, मनसे विभाग अध्यक्ष राजेश येरुणकर, विभाग अध्यक्ष चिन्मय गोयल यांनी बॅनरच्या माध्यमातून ही विनंती केली आहे.