महाराष्ट्रातील दुकानांवर मराठी पाट्या लावा अन्यथा खळखट्याक, असा मजकूर असलेला बॅनर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून लावण्यात आला आहे.शेवटचे चार दिवस शिल्लक आहेत, मराठी पाट्या करा अन्यथा मनसेचा दणका असे पोस्टर मनसे कडून लावण्यात आले आहेत.मनसे कडून थेट व्यापारांना इशारा देण्यात आला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून हे बॅनर चेंबूर स्टेशन परिसरात लावण्यात आले आहेत.मराठी पाट्यांच्या संदर्भात चार दिवसांचा कालावधी आता उरला, मराठी पाट्या करा नाहीतर मनसेचा खळखट्याक, असा मजकूर असलेले बॅनर्स मनसेने लावले आहेत.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे महाराष्ट्रातील सर्व दुकानांवरील पाट्या २५ नोव्हेंबरपर्यंत मराठीत असायला हव्यात, असा बॅनर मनसेकडून लावण्यात आला आहे.
मनसेने सुरुवातीपासून मराठी पाट्यांवरुन आक्रमक भूमिका घेतलीय. त्यात कोर्टाने दिलेल्या देडलाईन नंतरही राज्यात अजून काही ठिकाणी पाट्या मराठी भाषेत काहींनी केल्या नाहीत. त्यामुळे मनसे पुढील काही दिवसात आक्रमक होण्याची चिन्ह आहेत. मनसेचे नेते आणि प्रवक्ते अनिल शिदोरे यांनी देखील याबाबत कोर्टाचा आदेश सांगत किती दिवस उरले आहेत याबाबत इशारा दिला आहे.
हे ही वाचा:
सर्पदंशाने मृत्यू झालेल्या युवकाला जिवंत करण्याचा दावा; मृतदेहाच्या बाजूला तासन् तास झोपला मांत्रिक!
‘शेतात राब जाळणाऱ्या शेतकऱ्यांना किमान हमीभाव योजनेचा लाभ देऊ नये’!
मोदींना पनवती म्हणणे राहुल गांधींना भोवणार!
नाशिक शहर पोलीस आयुक्तांची उचलबांगडी; संदीप कर्णिक नवे पोलीस आयुक्त
या अगोदर सुप्रीम कोर्टाने देखील दुकानांवर मराठी पाट्या लावण्याचे दिले होते.मराठी पाट्या लावण्याबाबत कोर्ट म्हणाले होते की, कचेरीत पैसा खर्च करण्यापेक्षा मराठी पाट्यांसाठी पैसे खर्च करा. येत्या दसरा-दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दोन महिन्यांत ग्राहकांना आकर्षित करण्याची ही नामी संधी आहे. त्यामुळे पुढील दोन महिन्यांत मुंबईसह राज्यभरातील सर्व दुकानं आणि आस्थापनांवर मराठी पाट्या दिसण्यास सुरुवात होईल अशी अपेक्षा आहे, असं सांगत सर्वोच्च न्यायालयाने मुंबईसह राज्यातील व्यापारी संघटनेला दोन महिन्यात दुकानांवर मराठी पाट्या लावण्याचे आदेश दिले होते.
दुकानांवर मराठी पाट्याबाबत राज ठाकरे म्हणाले होते की, महाराष्ट्रात असाल तर मराठीत इतर राज्यात असाल तर तिथल्या भाषेत पाट्या असणं किंवा त्या ठिकाणी त्या भाषेचा सन्मान करणं ह्यात विरोध करण्यासारखं काय होतं. तुम्ही जर व्यापारासाठी इथे महाराष्ट्रात येता तर इथल्या भाषेचा सन्मान तुम्ही केलाच पाहिजे. असो, माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी ह्या मुद्द्यावर संघर्ष केला, आता सर्वोच्च न्यायालयाने पण ह्यावर काही मूठभर व्यापाऱ्यांना चपराक दिली आहे.
दरम्यान, मनसेकडून आता व्यापाराना चार दिवसाचा अल्टिमेट देण्यात आला आहे. २५नोव्हेंबरपर्यंत मराठी नावाच्या पाट्या लागल्या नाहीत तर खळखट्याक.त्यामुळे मनसे पुढील काही दिवसात मराठी पाट्यांवरून आक्रमक होण्याची चिन्ह आहेत.