महाराष्ट्र हा सुरुवातीपासून वेगळा आहे. वेगळाच राहणार. मात्र हल्ली विशेषतः इलेकट्रोनिक माध्यमातील बदललेली पत्रकारिता हा चिंतेचा विषय आहे. प्रश्नच समजत नाहीत. इतिहास माहित नाही आणि केवळ दिवस ढकलायचा म्हणून काहीतरी बातमी द्यायची, हे योग्य नाही. याला यापुढे अटकाव लागलाच पाहिजे असे मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केले. पिंपरी-चिंचवड येथे आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.
राज ठाकरे म्हणाले, सध्याच्या पत्रकारितेमध्ये काही ठराविक पत्रकार आणि त्यांचे प्रमुख यांच्याकडून पत्रकारितेचा स्तर खाली आणला जात आहे. एक नेता काय म्हणाला त्यावर तुमचे मत काय? या पलीकडे पत्रकारिता राहिलेली नाही. राजकारणातील भाषेचा स्तर घसरत आहे तो केवळ अशा प्रकारची भाषा बोलली जाते ती माध्यमामधून दाखवली जाते म्हणून आहे. अशी विधाने दाखवणे बंद केली पाहिजेत. दाखवायचे बंद केले तर बोलणार कोठे? असा सवाल त्यांनी केला.
पत्रकारांवरील हल्ले ही समर्थनीय बाब नाही त्याचा निषेधच केला पाहिजे. पत्रकारांनी वस्तुनिष्ठ बातम्या द्याव्यात. पूर्वी एखाद्या राजकीय नेत्याची भूमिका चुकली तर वर्तमानपत्रामधून त्याच्याविरोधात खूप लिहून यायचे. संपादकीय मधून तासले जात असे. मात्र सध्या तसे होताना दिसत नाही. अशी भूमिका आजच्या पत्रकारांनी घेणे आवश्यक आहे. पत्रकारितेमध्ये घुसलेल्या काही अपप्रवृत्तींना धडा शिकवणेही गरजेचे असल्याचेही ठाकरे म्हणाले.
हे ही वाचा:
दिल्लीतील बलात्कारात पतीला पत्नीची साथ !
‘रघुराम राजन राजकीय नेते झाले आहेत’!
अल्पसंख्याक शिष्यवृत्तीसाठी राज्याराज्यात बनावट संस्था, विद्यार्थी
आशिया कप संघनिवडीसाठी रोहित शर्मा उपस्थित राहणार
राज ठाकरेंना फरार करणारा तो संपादक कोण ?
यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी १९८६ चा किस्सा सांगितला. ते म्हणाले १९८६ मध्ये माझ्यावर खुनाचा आरोप झाला होता. तेव्हा एका सांज दैनिकाने मी माझ्या घरात बसलो असतानाही राज ठाकरे फरार अशी बातमी दिली होती. आता ही कुठली पत्रकारिता? अशा वेळी काही प्रतिक्रिया व्यक्ती म्हणून उमटल्या तर? असा सवाल त्यांनी केला. या त्यांच्या विधानानंतर तो सांज दैनिकाचा संपादक कोण? या बद्दल कुजबुज सुरु झाली आहे.