26 C
Mumbai
Wednesday, November 13, 2024
घरविशेषमुंबईत मनसेचे टोलनाका आंदोलन पेटले; नवघर पोलीस ठाण्यात तीन वेगवेगळे गुन्हे

मुंबईत मनसेचे टोलनाका आंदोलन पेटले; नवघर पोलीस ठाण्यात तीन वेगवेगळे गुन्हे

मनसे नेते अविनाश जाधव सह १३ मनसैनिकांना अटक

Google News Follow

Related

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी सकाळी घेतलेल्या टोलनाका संदर्भातील पत्रकार परिषदेनंतर दुपारी मुलुंड, ऐरोली आणि वाशी टोलनाक्यावर मनसेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. दरम्यान मुलुंड पूर्व आनंद नगर टोलनाक्याच्या कॅबिन मध्ये पेटते टायर टाकून टोलनाका जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणी नवघर पोलिसांनी ठाण्यातील मनसेचे नेते अविनाश जाधव यांच्यासह १३मनसैनिकाना ताब्यात घेवून दंगलीचे तीन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले असून याप्रकरणात ताब्यात घेण्यात आलेल्याना अटक करण्यात आली आहे.

 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेनंतर सोमवारी दुपारी मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी आपल्या कार्यकर्त्यासह मुलुंड पूर्व येथील आनंद नगर टोलनाका या ठिकाणी दाखल होत आंदोलन सुरू केले, दरम्यान नवी मुंबईतील मनसैनिकांनी ऐरोली टोलनाका येथे आंदोलन सुरू केले.घटनास्थळी दाखल झालेल्या नवघर पोलिसांनी मनसेचे नेते अविनाश जाधव आणि इतर आंदोलन कर्त्यांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली.

 

 

अविनाश जाधव यांना पोलिसानी ताब्यात घेऊन नवघर पोलिस ठाण्यात घेऊन जात असताना एकाने पेटता टायर आनंदनगर टोलनाक्याच्या कॅबिन मध्ये टाकून टोलनाका जाळण्याचा प्रयत्न केला, दरम्यान पोलिसानी तात्काळ आग विझवून पेटता टायर टाकणाऱ्याला ताब्यात घेऊन नवघर पोलीस ठाण्यात आणण्यात आले. तसेच ऐरोली टोल नाका या ठिकाणी आंदोलन करणाऱ्या मनसैनिकांना ताब्यात घेऊन नवघर पोलीस ठाण्यात आणून मनसे नेते अविनाश जाधव यांच्यासह आंदोलनकर्त्यांविरुद्ध आंदोलन आणि दंगलीचे दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करून याप्रकरणी अविनाश जाधव यांच्यासह १३ जणांना अटक करण्यात आली आहे.

 

हे ही वाचा:

‘गडकरी’ सिनेमाचा जबरदस्त टिझर प्रदर्शित

भारतातील अमली पदार्थांच्या व्यापाराचे धागेदोरे पाकच्या ‘डी’ गँगपर्यंत

सॉफ्टवेअर हॅक करून लुटलेल्या २५ कोटींच्या गुन्ह्याची उकल करताना आढळला १६ हजार कोटींचा घोटाळा

अबब! अबू आजमींचे ४५ फ्लॅट, वाराणसीच्या टॉवरमध्ये पाच मजले जप्त

दरम्यान पेटता टायर टाकून टोलनाका जाळण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध वेगळा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आंदोलनाचे पडसाद नवी मुंबईतील वाशी टोलनाका येथे उमटले असून वाशी टोल नाका या ठिकाणी मनसैनिकानी टोल बंद आंदोलन केल्याची माहिती समोर आली. नवघर पोलिसांनी अटक केलेल्या आंदोलन कर्त्यांना मंगळवारी मुलुंड न्यायालयात हजर केले जाणार असल्याचे समजते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा