पाकिस्तानी चित्रपट भारतात प्रदर्शित कसा होऊ दिला जातो?

'लिजंड ऑफ मौला जट'वरून मनसेचा संताप

पाकिस्तानी चित्रपट भारतात प्रदर्शित कसा होऊ दिला जातो?

‘लिजेंड ऑफ मौला जट’ नावाच्या पाकिस्तानी चित्रपट प्रदर्शनावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने संताप व्यक्त करत आक्रमक पवित्रा घेतला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी स्वतः ट्वीटकरत थिएटर मालकांना थेट इशाराच दिला आहे. पाकिस्तानी कलाकारांचे सिनेमे मुळात भारतात प्रदर्शित का होऊ दिले जातात?, असा सवाल उपस्थित करत, महाराष्ट्रात हा सिनेमा रिलीज होऊ दिला जाणार नसल्याचे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी स्पष्ट केले आहे.

राज ठाकरे ट्वीटकरत म्हणाले, फवाद खान नावाच्या पाकिस्तानी अभिनेत्याचा, ‘लिजेंड ऑफ मौला जट’ नावाचा सिनेमा लवकरच भारतात प्रदर्शित होणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा सिनेमा कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही. पाकिस्तानी कलाकारांचे सिनेमे मुळात भारतात प्रदर्शित का होऊ दिले जातात? आणि कलेला देशांच्या सीमा नसतात, हे सगळं इतर बाबतीत ठीक आहे, पण पाकिस्तानच्या बाबतीत हे अजिबात चालू देणार नाही.

हे ही वाचा : 

पंतप्रधानांकडून बायडेन यांना चांदीच्या भारतीय ट्रेनचे मॉडेल भेट!

पंतप्रधान मोदींच्या भेटीदरम्यान अमेरिकेकडून तस्करी झालेल्या २९७ मौल्यवान कलाकृती भारताला परत!

मुुंबई विद्यापीठ सिनेटच्या निवडणुका आज रविवारी; मुंबई उच्च न्यायालयाने दिला आदेश

आमदार अतुल भातखळकरांनी दिले लक्ष्मीच्या पंखांना बळ!

हिंदुस्थानचा द्वेष या एकमेव मुद्द्यावर जो देश तगला आहे, अशा देशातील कलाकारांना इथे आणून नाचवणं, त्यांचे सिनेमे प्रदर्शित करून देणं हा काय प्रकार सुरु आहे? महाराष्ट्र सोडाच पण देशातील कुठल्याच राज्यात हा सिनेमा तिथल्या तिथल्या सरकारांनी प्रदर्शित होऊ नाही दिला पाहिजे. अर्थात बाकीच्या राज्यांनी काय करायचं हा त्यांचा प्रश्न आहे. महाराष्ट्रात हा सिनेमा रिलीज होऊ दिला जाणार नाही, हे नक्की. या आधी असे प्रसंग जेंव्हा आले होते तेंव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिलेला दणका सगळ्यांना आठवत असेल. त्यामुळे थिएटर मालकांना सध्या तरी नम्रपणे आवाहन आहे की उगाच सिनेमा प्रदर्शित करण्याच्या भानगडीत पडू नका.

ते पुढे म्हणाले,  हा सिनेमा जेंव्हा प्रदर्शित होणार आहे, त्याच्या आसपास नवरात्रौत्सव सुरु होणार आहे. अशावेळेस कुठलाही संघर्ष महाराष्ट्रात व्हावा अशी माझी इच्छा नाही. तशीच ती इच्छा राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि राज्याच्या पोलीस महासंचालकांची पण नसणार. तसेच आम्हाला उगाच संघर्ष नको आहे. त्यामुळे वेळीच पाऊलं उचलून हा सिनेमा आपल्याकडे प्रदर्शित होणार नाही हे पहावे. मराठी सिनेमांना थिएटर्स उपलब्ध करून देताना मागेपुढे करणाऱ्या थिएटर मालकांनी जर पाकिस्तानी सिनेमाला या भूमीत पायघड्या घातल्या, तर हे औदार्य महागात पडेल हे विसरू नये. कुठल्यातरी पाकिस्तानी सिनेमासाठी राज्यात संघर्ष होऊ नये अशीच माझी इच्छा आहे आणि सरकार त्याकडे योग्य ते लक्ष देईल याची मला खात्री आहे, असे राज ठाकरेंनी म्हटले आहे.

Exit mobile version