अमोल मिटकरींच्या गाडीची तोडफोड करणाऱ्या मनसे कार्यकर्त्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

अटकेत असलेले आणखी दोन कार्यकर्ते प्रकृती अस्वस्थ्यामुळे रुग्णालयात दाखल

अमोल मिटकरींच्या गाडीची तोडफोड करणाऱ्या मनसे कार्यकर्त्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेनंतर मंगळवार, ३० जुलै रोजी काही मनसैनिकांनी अमोल मिटकरींच्या गाडीची तोडफोड केली. दरम्यान, तोडफोड प्रकरणातील मुख्य आरोपी पंकज साबळे आणि दुसरे पदाधिकारी सौरभ भगत यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात १३ लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून १० आरोपी अद्याप फरार आहेत. तोडफोड प्रकरणातील मुख्य सुत्रधार मनसेचे प्रदेश सरचिटणीस कर्णबाळा दुनबळे हे ही फरार आहेत.

राज ठाकरेंवर केलेल्या आरोपानंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले. मनसे कार्यकर्त्यांनी अमोल मिटकरी यांची गाडी फोडली. या राड्यामध्ये मनसे पदाधिकारी जय मालोकार हे देखील सहभागी होते. राड्यानंतर काही वेळातच जय मालोकार यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना अकोल्यातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. या राड्यात झालेल्या झटापटीनंतर जय मालोकार यांच्या छातीत दुखत होतं, त्यामुळे त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर उपचार सुरू होते. दरम्यान, त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न आणि गाडी तोडफोड प्रकरणातील मुख्य आरोपी पंकज साबळे आणि दुसरे पदाधिकारी सौरभ भगत यांना अटक करण्यात आली आहे. पंकज साबळे मनसेचे अकोला जिल्हाध्यक्ष आहेत. दोघांनाही अटक केल्यानंतर अस्वस्थ वाटत असल्यानं उपचारासाठी जिल्हा शासकीय सर्वोपचार रूग्णालयात दाखल करण्यात आलं. तोडफोड प्रकरणातील मुख्य सुत्रधार मनसेचे प्रदेश सरचिटणीस कर्णबाळा दुनबळे अद्याप फरारच अहेत.

हे ही वाचा:

वायनाड भूस्खलनातील मृतांची संख्या १४५ हून अधिक; अजूनही बचावकार्य सुरू

अरविंद वैश्यच्या अंत्ययात्रेवर दगडफेक करणारे महिलांच्या पुढाकाराने जेरबंद

ठाकरेंनी ब्रह्मास्त्रच काढले…

मध्यप्रदेशातील मदरशांवर कारवाई सुरू, श्योपूर जिल्ह्यातील ५६ मदरशांची मान्यता रद्द !

राज ठाकरेंवर केलेल्या टीकेमुळे अकोल्यातील मनसे कार्यकर्त्यांनी अमोल मिटकरी यांच्या गाडीची तोडफोड केल्यानंतर अमोल मिटकरींनी पोलीस ठाणे गाठत ठिय्या आंदोलन सुरू केलं. गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार, अशी भूमिका घेतली. त्यानंतर सर्व पदाधिकाऱ्यांवर पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यात आले आणि मिटकरींनी आपलं आंदोलन मागे घेतलं.

Exit mobile version