23 C
Mumbai
Sunday, December 29, 2024
घरविशेषएमएमआरडीए करणार मेट्रो १च्या मालमत्तेची तपासणी

एमएमआरडीए करणार मेट्रो १च्या मालमत्तेची तपासणी

Google News Follow

Related

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) कार्यकारी समितीने मुंबई मेट्रो १ च्या मालमत्तेची चाचपणी प्रक्रियेला सुरूवात केली आहे. एमएमआरडीए लवकरच मुंबई मेट्रो १ ताब्यात घेणार आहे. त्यापुर्वीच्या प्रक्रियेला सुरूवात केली आहे. त्यासाठी एमएमआरडीएने एका सल्लागाराच्या नियुक्तीचा निर्णय घेतला आहे.

मुंबईतील मेट्रो १ ही ११.५ किमी लांबीची मार्गिका वर्सोवा-घाटकोपर या दोन ठिकाणांना जोडणारी आहे. ही मार्गिका खासगी- सार्वजनिक सहकार तत्त्वावर (पब्लिक प्रायव्हेट पार्टनर्शिप- पीपीपी) मुंबई मेट्रो वन ऑपरेशन्स लिमिटेड (एमएमओपीएल) या कंपनीकडून बांधण्यात आली होती. २०१४ मध्ये सुरू झालेल्या या कंपनीमध्ये ६९ टक्के हिस्सा हा आर- इन्फ्रा, एमएमआरडीएचा २६ टक्के हिस्सा आणि ट्रान्सडेव्ह या कंपनीचा ५ टक्के हिस्सा होता. यापैकी आर-इन्फ्राचे मालक अनिल अंबानी यांनी मागिल वर्षी एमएमआरडीएला पत्र लिहून एमएमओपीएलमधील त्यांचा वाटा विकण्याची तयारी दर्शवली होती.

हे ही वाचा:

भारताने इस्रायलविरोधी भूमिका घ्यावी-काँग्रेस

महाराष्ट्र मॉडेल अनुसरा, पीआर आणि सोशल मीडियासाठी पैसे उधळा

इस्राएलविरुद्ध इस्लामिक राष्ट्र आक्रमक, ‘ही’ कारवाई करणार

पंतप्रधान जिल्हाधिकाऱ्यांना देणार कानमंत्र

एमएमआरडीएचे आयुक्त आर ए राजीव यांनी दिलेल्या माहितीनुसार एक भागीदार म्हणून एमएमआरडीएचा या आर- इन्फ्राच्या खरेदीत प्रथम हक्क राहणार आहे. त्याबरोबरच एमएमआरडीए मुंबईत विविध ठिकाणी मेट्रो मार्गिका बांधत असल्याने त्या मार्गिका आणि ही मार्गिका यांच्यातील ताळमेळ देखील योग्य तऱ्हेने साधला जाईल. त्याशिवाय जर एमएमओपीएल जर ही मार्गिका चालवण्यास असमर्थ ठरत असेल तर ही मार्गिका सरकारने ताब्यात घेणे अटळ आहे. असेही त्यांनी सांगितले.

मिळालेल्या माहितीनुसार आर- इन्फ्राने एमएमओपीएलमधील त्यांच्या वाट्याचे २,५००- २,६०० कोटी रुपये सांगितले आहेत. एमएमआरडीएने नियुक्त केलेला सल्लागार आर- इन्फ्राच्या सर्व मालमत्ताची पाहणी करून त्यांची योग्य किंमत निश्चित करेल. एमएमआरडीएला यामुळे आर- इन्फ्राला किती रक्कम द्यायची हे सुनिश्चित करणे शक्य होईल. या सल्लागाराचा अहवाल पुढील चार महिन्यात प्राप्त होणे अपेक्षित आहे.

एमएमओपीएल आणि एमएमआरडीए यांच्यात सातत्याने दररचनेवरून वाद होत होते. एमएमओपीएल या मेट्रोच्या तिकीटांचे दर वाढवून हवे होते. या प्रकल्पाची मुळ रक्कम २,३५६ कोटी रुपये होती, जी १,९३५ कोटी रुपयांनी वाढली होती, त्यामुळे मेट्रोच्या तिकीट दरांतील वाढ आवश्य असल्याचे एमएमओपीएलकडून सातत्याने सांगितले जात होते. एमएमओपीएलने संचालनात ९० लाख रुपयांचा तोटा होत असल्याचे देखील सांगितले होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा