करवीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार पी. एन. पाटील यांचे निधन

वयाच्या ७१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

करवीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार पी. एन. पाटील यांचे निधन

काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष आणि करवीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार पी. एन. पाटील यांचे निधन झाल्याचे वृत्त समोर आले आहे. गुरुवार, २३ मे रोजी पहाटे खासगी रुग्णालयात उपचारांदरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या ७१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या चार दिवसांपासून पाटील यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. गांधी घराण्याचे विश्वासू अशी त्यांची ओळख होती.

आमदार पी. एन. पाटील हे रविवारी सकाळी बाथरूममध्ये पाय घसरून पडल्याने त्यांच्या डोक्याला मार लागला होता. त्यानंतर खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. पण, अखेर त्यांची झुंज अपयशी ठरली आणि गुरुवारी पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पाटील यांच्या डोक्यारा मार लागल्यानंतर त्यांच्या मेंदूत रक्तस्त्राव झाला होता. जिल्हा काँग्रेसने दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे पार्थिव जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार असून, सडोली खालसा या त्यांच्या मूळ गावी गुरुवारी सकाळी ११ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

पी. एन. पाटील रविवारी सकाळी साडे आठ सुमारास घरी चक्कर येऊन बाथरुममध्ये पडले. यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांचे एमआरआय स्कॅन करण्यात आलं. ज्यामुळे पाटील यांच्या मेंदूत रक्तस्त्राव झाल्याचं लक्षात आले. त्यांना तातडीने आधार रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र, त्यांच्या मेंदूची सूज कायम होती. त्यामुळे प्रकृती स्थिर असली तरी गंभीर होती. अखेर त्यांचा हा लढा अपयशी ठरला.

हे ही वाचा:

१७ वर्षांत एकदाही विजेतेपद नाही

बंगालमधील सन २०१० पासूनची ओबीसी प्रमाणपत्रे रद्द

ब्रिटनमध्ये ४ जुलै रोजी सार्वत्रिक निवडणूक

उपराष्ट्रपती धनखड इराणला रवाना, काय कारण?

काँग्रेसचे एकनिष्ठ नेता म्हणून पांडुरंग निवृत्त्ती पाटील म्हणजेच पी एन पाटील यांची राज्यात ओळख होती. मागील ४० वर्षांपासून ते राजकारणात सक्रिय होते. २००४ आणि २०१९ असं दोनवेळा त्यांनी आमदार पद भूषवलं. मतदारसंघांची पुनर्रचना झाल्यानंतर त्यांनी २००९, २०१४ मध्ये करवीरमधून निवडणूक लढवली पण, त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.

Exit mobile version