राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले असून काल (५ डिसेंबर) देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यासह आज विधानसभेच्या हंगामी अध्यक्षांचा शपथविधी पार पडणार आहे. अध्यक्षपदासाठी भाजपाचे आमदार कालिदास कोळंबकर यांची निवड करण्यात आली आहे. राज्यपाल सीपी राधाकृष्णन हे आज कालिदास कोळंबकर यांना हंगामी अध्यक्षपदाची शपथ देणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, राजभवनात दुपारी १ च्या सुमारास हा शपथ सोहळा पार पडणार आहे. ७ ते ९ डिसेंबर दरम्यान विधानसभेचे विशेष अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनात हंगामी अध्यक्षपदी म्हणून कालिदास कोळंबकर असणार आहेत. या अधिवेशनादरम्यान कोळंबकर नवनिर्वाचित आमदारांना पद आणि गोपनीयतेची शपथ देणार आहेत.
हे ही वाचा :
शपथविधीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली स्वाक्षरी वैद्यकीय मदतीच्या फाईलवर
ठाकरेंचा कडेलोट नेमका कोणामुळे झाला…
२०१९-२०२२ मध्ये संधी हुकली, पण यंदा जनतेने फडणवीसांना अविश्वसनीय बहुमत दिलं!
शिंदेंनी पहिल्यांदा तर अजित पवारांनी सहाव्यांदा घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ!
दोन दिवस हा शपथविधी होणार असून शेवटच्या दिवशी ९ डिसेंबरला विधानसभेच्या नव्या अध्यक्षांची निवड करण्यात येणार आहे. दरम्यान, कालिदास कोळंबकर हे सलग नऊ वेळा विधानसभेवरती निवडून गेले आहेत. हंगामी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आल्यानंतर कोळंबकर यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, पक्षाने मला सांगितले आहे, त्यानुसार मी आज दुपारी हंगामी अध्यक्ष म्हणून शपथ घेणार आहे.