27 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरविशेषआमदार अतुल भातखळकरांनी दिले लक्ष्मीच्या पंखांना बळ!

आमदार अतुल भातखळकरांनी दिले लक्ष्मीच्या पंखांना बळ!

जळगावच्या दीपस्तंभ संस्थेतून मुंबईत आलेल्या दिव्यांग विद्यार्थीनीला दिला आधार

Google News Follow

Related

भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी दोन वर्षांपूर्वी त्यांच्या मतदारसंघात दिव्यांगांसाठी गार्डन उभे केले होते. मुंबई उपनगरातला हा पहिलाच प्रायोगिक प्रकल्प होता आणि आज मोठ्या संख्येने दिव्यांग मुले या गार्डनचा लाभ घेताना दिसतात. दिव्यांगांकरिता सतत धडपड करणारे आमदार अतुल भातखळकर यांनी अशाच एका सोलापूरच्या दिव्यांग मुलीच्या स्वप्नांना बळ देण्याचे काम केले आहे.

लक्ष्मी शिंदे ही मुळची सोलापूरची. जन्मतःचं दोन्ही हात नसलेली तरुणी. लक्ष्मीच्या पायातही फारशी ताकद नव्हती. हळूहळू मसाज उपचारांनी तिच्या पायात ताकद आली आणि सरपटत चालणारी लक्ष्मी स्वतःच्या पायावर उभी राहिली. १२ वी पर्यंतचे आर्ट्स शाखेतील शिक्षण पूर्ण करून लक्ष्मी जळगावच्या दीपस्तंभ संस्थेत पुढील शिक्षणासाठी दाखल झाली. तिने कष्ट आणि मेहनतीच्या जोरावर पदवी शिक्षण पूर्ण करून एमपीएससी परीक्षेची तयारी सुरु केली. परिक्षेचा पहिला प्रयत्नही झाला पण नंतर चित्रकलेमध्ये करिअर करायचे असा निर्धार लक्ष्मी हिने केला. आपला निश्चय पूर्ण करण्यासाठी तिने पायाने चित्रकला करण्यात प्राविण्य मिळविले. स्वित्झर्लंडमधील एका संस्थेमार्फत अंधेरी येथील इन्स्टीटयूटमध्ये चित्रकलेतील पुढील शिक्षणासाठी लक्ष्मी आता मुंबईत दाखल झाली आहे. जळगावच्या दीपस्तंभ संस्थेने हिंमत दिल्यानंतर लक्ष्मीच्या पंखांमध्ये बळ देण्यासाठी भाजपा आमदार अतुल भातखळकर ठाम पणे उभे राहिले आहेत.

हे ही वाचा..

आतिशी यांनी घेतली दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाची शपथ

लालबागच्या राजाच्या चरणी कोट्यवधींचे दान

तिरुपती लाडू प्रकरणात ‘अमूल’चे नाव घेतल्याबद्दल तक्रार दाखल

प्रसादाच्या लाडूला पुन्हा मिळाले पावित्र्य

आमदार अतुल भातखळकर याविषयी म्हणाले की, “जळगावच्या दीपस्तंभ फाउंडेशनने लक्ष्मीची स्वप्न पूर्ण करण्यासाठी हिंमत दिली आणि मुंबईत पाठवले. हजारो दिव्यांग विद्यार्थ्यांचा दीपस्तंभ असलेल्या यजुर्वेंद्र महाजन मास्तरांनी लक्ष्मीच्या राहण्याच्या व्यवस्थेसाठी मला संपर्क केला असता तिची इतरत्र कुठेही व्यवस्था न करता माझ्या घराच्या शेजारी असलेल्या माझ्या आईच्या घरात लक्ष्मीची राहायची सोय करून दिली. दिव्यांगांकरिता काही करण्याचे नेहमीच डोक्यात विचार चालू असतात. दोन वर्षांपूर्वी एक सुरुवात म्हणून मतदार संघात दिव्यांगांसाठी गार्डन उभे केले होते. जेव्हा दिव्यांग मुलं त्याचा लाभ घेताना पाहतो तेव्हा ऊर भरून येतो. तसाच लक्ष्मीसाठी कामी येताना ऊर भरून आला आहे.”

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा