तामिळनाडूमध्ये आपत्ती असताना एमके स्टॅलिन इंडी आघाडीच्या बैठकीत रमले होते

केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांनी उडवली खिल्ली, तमिळनाडूला पुरेसा निधी दिल्याचीही दिली माहिती

तामिळनाडूमध्ये आपत्ती असताना एमके स्टॅलिन इंडी आघाडीच्या बैठकीत रमले होते

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन हे इतकी मोठी आपत्ती आली असताना आणि पूर परिस्थिती असताना इंडी आघाडीच्या दिल्लीतील बैठकीत सहभागी झाले होते. केंद्र सरकारने तमिळनाडूला ९०० कोटी रुपयांचा निधी दोन हप्त्यामध्ये दिला आहे, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिल्ली येथे पत्रकार परिषदेत दिली.

हेही वाचा..

ब्रिटिशकालिन कायदे बदलले हा ऐतिहासिक क्षण!

सर्वोच्च न्यायालयाने एका वर्षात निकाली काढले ५२ हजार खटले!

अझरबैजानचे पाकप्रेम उफाळले; भारत-आर्मेनिया शस्त्र करारावर टीका

“शरणागती पत्करा अथवा मरणाला सामोरे जा”, नेतन्याहूंचा हमासला इशारा!

मंत्री सीतारमण म्हणाल्या, मुसळधार पाऊस आणि अतिवृष्टीमुळे तामिळनाडूतील चार जिल्ह्यांमध्ये सुमारे ३१ जणांचा मृत्यू झाला आहे. केंद्र सरकारने तामिळनाडूला या आर्थिक वर्षात दोन हप्त्यामध्ये सुमारे ९०० कोटी रुपयांचा निधी वापरण्यासाठी दिला आहे. चेन्नईमध्ये तीन डॉपलरसह अत्याधुनिक उपकरणे आहेत. १२ डिसेंबर रोजीच या माध्यमातून तेनकासी, कन्याकुमारी, तिरुनेलवेली आणि १७ डिसेंबर रोजी तुतीकोरीन या चार जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला होता.

हवामान अंदाजाबद्दल डीएमके मंत्री थंगराज यांनी हवामान संदर्भात उशिरा अपडेट देण्यात आली असे विधान केले होते, त्याचे सीतारमण यांनी खंडन केले. तामिळनाडू सरकारने त्यांना देण्यात आलेली सुमारे ४ हजार कोटी रुपयांची मदत वापरायला हवी होती. राष्ट्रीय आपत्ती अशी घोषणा कधीच करता येत नसते. कोणत्याही राज्याला आपत्ती जाहीर करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे आहेत.

 

Exit mobile version