मितालीने म्हणून केले पंतप्रधान मोदींचे कौतुक

मितालीने म्हणून केले पंतप्रधान मोदींचे कौतुक

भारतीय महिला संघाची माजी कर्णधार मिताली राज हिने एका रिअलिटी शोमध्ये उपस्थिती लावली होती. यावेळी तिने २०१७ विश्वचषकाच्या नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटल्याचा किस्सा सांगितला आहे. विश्वचषक हरल्यानंतरही ज्या पद्धतीने पंतप्रधान मोदींनी प्रोत्साहन केले, हे मिताली राजने सांगितले आहे.

सुपरस्टार सिंगर सीझन २ या रिअलिटी शोमध्ये मिताली राजने उपस्थिती लावली होती. या शोमध्ये तिला पंतप्रधान मोदींच्या पहिल्या भेटीबद्दल विचारणा झाली. यावेळी तिने पंतप्रधान मोदींचे आभार मानले आहेत. ती म्हणाली, २०१७ सालच विश्वचषक झाल्यानंतर आम्ही भारतात आलो होतो. त्यावेळी विमानतळावर आमचे स्वागत करण्यात आले होते. त्यावेळी पंतप्रधान मोदी आवर्जून भेटायला आले होते. वेळात वेळ काढून पंतप्रधान मोदी आम्हाला भेटायला आले होते. प्रत्येक खेळाडूला त्यांनी नावाने ओळखले होते, कौतुक केले होते. विशेष म्हणजे, आम्ही हरलो असताना पंतप्रधान मोदींनी आमचा सन्मान केला होता. विश्वचषक हरल्यानंतरही तुम्ही सगळ्यांची मन जिंकली आहेत, असे पंतप्रधान मोदींनी सांगितले होते.

हे ही वाचा:

सोबतच्या पंधरा आमदारांना उद्धव ठाकरेंचं भावनिक पत्र

१६ आमदारांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा

झारखंडच्या ‘ज्या’ शाळांनी नियम बदलले, त्यांच्यावर होणार कारवाई

महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यात राजकीय भूकंप; काँग्रेसचे १० आमदार भाजपाच्या वाटेवर

मिताली राज हिने ही आठवण सांगितली त्याचा व्हिडीओ सुशांत सिन्हा यांनी शेअर केला आहे. फोटो शेअर करताना सिन्हा यांनी लिहले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हारल्यानंतरही ज्या पद्धतीने खेळाडूंना प्रोत्सहन देतात ते अतुलनीय आहे.

Exit mobile version