भारतीय महिला क्रिकेट संघाची धडाकेबाज खेळाडू मिताली राज हिने महिला क्रिकेटमध्ये एक नवा विक्रम केला आहे. मितालीने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत दहा हजार धावांचा टप्पा पार केला आहे. हा टप्पा गाठणारी मिताली ही पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीला मितालीच्या आधी इंग्लंडची शार्लेट एडवर्ड्स ही एकमेव खेळाडू आहे जिने दहा हजार धावांचा टप्पा पार केला आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्या महिला संघांमध्ये सध्या मालिका सुरु आहे. या मालिकेचा तिसरा सामना शुक्रवारी खेळला गेला. लखनऊ येथील अटल बिहारी वाजपेयी स्टेडियममध्ये खेळवल्या गेलेल्या या सामन्यात मिताली राज हिने हा विक्रम रचला आहे. सामन्याच्या २८ व्या षटकात चौकार मारत मितालीने आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेट मध्ये दहा हजार धावा पूर्ण केल्या.
हे ही वाचा:
सचिन वाझेंना अडकवणारे अधिकारी कोण?
इस्रोकडून अति-उंचीवरील वातावरणाच्या अभ्यासासाठी साऊंडिंग रॉकेटचे प्रक्षेपण
बंगाल निवडणुकीच्या तोंडावर ‘या’ बंगाली नेत्याला काँग्रेसने हटवले
मिताली राज हिने १९९९ साली भारतासाठी आपला पहिला सामना खेळला. आजवर मिताली हिने भारताचे प्रतिनिधित्व करताना २१२ एकदिवसीय सामने, १० कसोटी सामने आणि ८९ टी२० सामने खेळले आहेत.
आपल्या क्रिकेटमधील उल्लेखनीय कामगिरीसाठी राज हिला अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे, ज्यात अर्जुन पुरस्कार आणि पद्मश्री पुरस्काराचाही समावेश आहे.