मिताली राजने विश्वचषक स्पर्धेत रचला हा विक्रम  

मिताली राजने विश्वचषक स्पर्धेत रचला हा विक्रम  

आयसीसी महिला विश्वचषक स्पर्धेचा रणसंग्राम सध्या सुरू असताना भारतीय चाहत्यांसाठी अत्यंत आनंदाचे वृत्त आहे. भारतीय महिला संघाची कर्णधार मिताली राज हिने विश्वविक्रम रचला आहे. बीसीआयने मिताली राज हिला शुभेच्छा दिल्या.

मितालीने विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक सामन्यात कर्णधार पद सांभाळण्याचा विक्रम आपल्या नावे केला आहे. तिने विश्वचषक स्पर्धेत २४ सामन्यांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे. भारतीय महिला संघात सध्या कर्णधार मिताली राज आणि झूलन गोस्वामी या दोन अनुभवी खेळाडू आहेत. झूलन गोस्वामीने न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम केला होता.

मिताली राजच्या नावावर अनेक विक्रम आहेत. पदार्पणाच्या सामन्यात शतक, सर्वात कमी वयात शतक, सर्वाधिक धावा असे अनेक विक्रम तिच्या नावे आहेत. मिताली हिने सचिन तेंडूलकरचा विक्रम मोडीत काढत सर्वाधिक क्रिकेट खेळणारी क्रिकेटपटू ठरली आहे. मिताली ही वनडे मध्ये ६ हजार धावांचा पल्ला ओलांडणारी पहिली महिला ठरली आहे, असे अनेक विक्रम मिताली हिच्या नावावर आहेत.

हे ही वाचा:

‘द काश्मीर फाईल्सला’ प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद! पहिल्या दिवशीच केली एवढी कमाई

भारत आणि श्रीलंकेची ‘गुलाबी’ कसोटी

राजधानी दिल्लीत अग्नितांडव; सात जणांचा मृत्यू

चुकून सुटलेले भारतीय क्षेपणास्त्र थेट घुसले पाकिस्तानमध्ये

विश्वचषक स्पर्धेआधी भारतीय संघ न्यूझीलंड विरुद्ध पाच सामन्यांची मालिका खेळला होता. या मालिकेत मिताली राजने तीन अर्धशतकासह दोनशेहून अधिक धावा केल्या होत्या. मिताली राजसाठी यंदाची विश्वचषक स्पर्धां शेवटची असणार आहे त्यामुळे तिच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ यंदातरी इतिहास रचून वर्ल्ड कप उंचावणार का? याकडे भारतीय चाहत्यांचे लक्ष आहे.

Exit mobile version