28 C
Mumbai
Friday, November 15, 2024
घरविशेषबासुरी स्वराज यांच्याविरोधातील याचिकेत चुकाच चुका !

बासुरी स्वराज यांच्याविरोधातील याचिकेत चुकाच चुका !

दिल्ली उच्च न्यायालयाने आपचे नेते भारती यांना फटकारले

Google News Follow

Related

आम आदमी पक्षाचे नेते सोमनाथ भारती यांनी भाजप खासदार बन्सुरी स्वराज यांच्या विरोधात त्रुटीयुक्त याचिका दाखल केल्यानंतर त्यांच्यावर दिल्ली उच्च न्यायालयाने जोरदार टीका केली. न्या. मनमीत प्रीतम सिंग अरोरा यांनी असे म्हटले आहे की, आपल्याला या याचिकेतील काही समजत नाही. त्यामुळे आपण नोटीस जारी करू शकत नाही.

या प्रकरणाची सुनावणी १३ ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्याआधी दिल्ली उच्च न्यायालयाने निर्णय दिला की, ही याचिका चुकांनी भरलेली आहे. खूप चुका आहेत. तुम्हाला आधी याचिका दुरुस्त करावी लागेल. त्यामुळे आपण नोटीस जारी करू शकत नाही. कारण मला समजू शकत नाही, त्यामुळे दुरुस्त केलेली याचिका दाखल करावी, असे न्या. अरोरा यांनी म्हटले आहे.

हेही वाचा..

“ओबीसी आरक्षणावर शरद पवार, उद्धव ठाकरे मूग गिळून गप्प बसलेत”

अडीच तास पंतप्रधानांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला…

“यंदाचा अर्थसंकल्प २०४७ सालच्या विकसित भारताचा पाया रचणारा असेल”

एनसीईआरटीच्या पुस्तकात आता ‘हडप्पा संस्कृती’चा उल्लेख ‘सिंधू सरस्वती संस्कृती’

नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघातून ७८,३७० मतांच्या फरकाने पराभूत झाल्यानंतर सोमनाथ भारती यांनी बन्सुरी स्वराज यांच्या विरोधात याचिका दाखल केली होती. त्यांनी निवडणूक स्वराज यांच्यावर गैरव्यवहाराचा आरोप केला होता. भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघातून बसपने रिंगणात उतरवलेले राज आनंद कुमार हे भाजपच्या इशाऱ्यावर आपच्या विरोधात काम करत असल्याचा दावा भारती यांनी केला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा