अपहरणकर्ता समजून कामगाराला जमावाकडून बेदम मारहाण!

पोलिसांनी रीतसर चौकशीकरून सोडून दिले

अपहरणकर्ता समजून कामगाराला जमावाकडून बेदम मारहाण!

तामिळनाडूमध्ये एका कामगाराला अपहरणकर्ता समजून जमावाने बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे.अपहरणकर्ता असल्याच्या संशयावरून परप्रांतीय कामगारावर जमावाच्या हल्ल्याची ही घटना पाचवी आहे.

मंगळवारी( १२ मार्च) ही घटना घडली.एक माणूस रस्त्यावरून चालत असताना व्हिडिओ कॉलवर बोलत होता.त्यावेळी काही माणसे जमली अन त्याचा ठावठिकाणा विचारात चौकशी करू लागली.मात्र, तो व्यक्ती मद्यधुंद अवस्थेत असल्याने जमावाला उत्तर देऊ शकला नाही.जमावाने त्याच्याकडून त्याचा फोनही मागितला.परंतु, त्या कामगाराने नकार देत मोबाईल बंद केला.

हे ही वाचा:

पंजाबमध्ये काँग्रेसला धक्का, कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या पत्नी भाजपात!

अनिल परबांना दणका; दापोलीमधील साई रिसॉर्ट चार आठवड्यात पाडावे लागणार

शेजारच्यांकडे लिंबू मागणे कॉन्स्टेबलला पडले महागात!

पाटणामधील सिव्हील कोर्टात ट्रान्सफॉर्मरचा स्फोट

यावर संतापलेल्या जमावाने त्याला अपहरणकर्ता समजून बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.यानंतर त्यांनी त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले.पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली.पोलिसांनी सांगितले, तो कामगार बिहारचा रहिवासी असल्याचे चौकशीमध्ये स्पष्ट झाले.बिहारमधून या ठीकाणी कामासाठी स्थलांतरित झाल्याचे त्याने सांगितले.

तपासात असे आढळून आले की, हा व्यक्ती आपल्या नातेवाईकासोबत व्हिडिओ कॉलवर बोलत होता, त्याचदरम्यान काही लोकांनी त्याच्याकडून मोबाईल मागितला.मात्र, हा जमाव चोरीचा प्रयत्न करत असल्याच्या भीतीने त्याने फोन बंद केला, असे कामगाराने पोलिसांना सांगितले.दरम्यान, पोलिसांनी त्याची रीतसर चौकशी करून तो अपहरणकर्ता नसल्याचे सांगितले आणि त्याची सुटका केली.

Exit mobile version