31 C
Mumbai
Sunday, November 24, 2024
घरविशेषमुंबई पोलीस दलात 'मिशन कर्मयोगी' उपक्रम राबविण्यात येणार

मुंबई पोलीस दलात ‘मिशन कर्मयोगी’ उपक्रम राबविण्यात येणार

राज्य शासनाच्या गृह विभागाची मंजुरी

Google News Follow

Related

केंद्र शासनाने सरकारी अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकरिता सुरू करण्यात आलेला ‘मिशन कर्मयोगी’ हा उपक्रम मुंबई पोलीस दलात प्रायोगिक तत्वावर राबविण्या साठी राज्य शासनाच्या गृह विभागाने मंजुरी दिली आहे. लवकरच हा उपक्रम मुंबई पोलीस दलात राबविण्यात येणार असून सर्व प्रथम ५५० पोलिसांना या उपक्रमाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
मुंबई पोलीस दलात सर्वप्रथम हा उपक्रम राबविण्यात आहे, त्यानंतर राज्यभरात हा उपक्रम राबविला जाणार असल्याचे एका वरिष्ठ अधिकारी यांनी दिली आहे.हा उपक्रम केवळ नागरी सेवा देणाऱ्या सरकारी अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी राबविण्यात येणार आहे.

 

नवी दिल्लीत राबविण्यात आलेल्या ‘मिशन कर्मयोगी’ उपक्रमाच्या पार्श्‍वभूमीवर,क्षमता निर्माण आयोगाच्या (सीबीसी) नागरिकांशी थेट संपर्क येणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांमध्ये वर्तणूक प्रशिक्षणाला महत्व देण्यात येते, यासाठी सीबीसी ने दिल्ली पोलिसांच्या निवडक पोलिस मास्टर ट्रेनर्सच्या प्रशिक्षणाची तपशीलवार माहिती आणि त्या प्रशिक्षणाचा मूल्यमापन अहवाल २० जुलै २०२३ रोजी सरकारला सादर केला होता.

 

हे ही वाचा:

फडणवीस म्हणाले, राज्यात भाजपाच बॉस!

लेडी ड्रग्स माफिया बेबी पाटणकरचा जामीन नाकारला, पण फरार

कोविड लस निर्मितीमध्ये योगदान देणाऱ्या शास्त्रज्ञांना औषधशास्त्रातील नोबेल पुरस्कार

छत्रपती शिवरायांच्या वाघनखांसाठी लंडनला जातोय हा अभिमानाचा क्षण !

सदर प्रशिक्षणाचा उद्देश आणि त्याचे परिणाम लक्षात घेऊन, मिशन कर्मयोगी उपक्रमांतर्गत प्रायोगिक तत्त्वावर मुंबई पोलीस आयुक्त कार्यालया अंतर्गत कार्यरत पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचा विषय राज्य शासनाच्या विचाराधीन होता. राज्य शासनाच्या गृह विभागाने याला मंजुरी दिली असून प्रायोगिक तत्वावर हा उपक्रम मुंबई पोलीस दलात सर्वात प्रथम राबविला जाणार आहे.

 

 

मुंबई पोलिसांसाठी राबविण्यात आलेल्या मिशन कर्मयोगी उपक्रमांतर्गत मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या आस्थापनेवरील ५५० मुख्य प्रशिक्षणार्थि मुंबई पोलीस दलातील ४५ हजार पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचे प्रशिक्षण देण्यासाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. हे प्रशिक्षण टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यात येणार आहे. तथापि, प्रशिक्षण देण्यासाठी तांत्रिकदृष्ट्या योग्य संस्थांच्या निवडीसाठी सीबीसीने तयार केलेल्या रिक्वेस्ट फॉर प्रपोजलचा (आरएफपी) अभ्यास केल्यानंतर, प्रशिक्षण संस्थेची निवड आणि प्रशिक्षण कार्यक्रमाची अंमलबजावणी पोलिस आयुक्त, मुंबई यांच्यामार्फत केली जाईल,” असे अधिकारी यांनी सांगितले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
195,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा