२२ जणांसह बेपत्ता झालेल्या रशियन हेलिकॉप्टरचे अवशेष सापडले, १७ मृतदेह ताब्यात !

रशियन  आपत्कालीन मंत्रालयाने दिली माहिती

२२ जणांसह बेपत्ता झालेल्या रशियन हेलिकॉप्टरचे अवशेष सापडले, १७ मृतदेह ताब्यात !

रशियाच्या सुदूर पूर्व भागात बेपत्ता झालेल्या हेलिकॉप्टरचे अवशेष रविवारी (१ सप्टेंबर) सापडले आहेत. तसेच बचाव पथकाला १७ मृतदेहही सापडले आहेत. रशियाचे Mi-८T हेलिकॉप्टर शनिवारी (३१ ऑगस्ट) टेक ऑफ केल्यानंतर काही वेळातच रहस्यमयरीत्या गायब झाले होते. बेपत्ता झालेल्या हेलिकॉप्टरमध्ये एकूण २२ सदस्य होते, ज्यामध्ये १९ प्रवासी आणि तीन क्रू मेंबर्स होते.

रशियन एमआय-८ हेलिकॉप्टरने कामचटका प्रदेशातील वखाखझाट्स ज्वालामुखीजवळील तळावरून निकोलायव्हकासाठी उड्डाण केले होते. मात्र, हेलिकॉप्टर टेकऑफ झाल्यानंतर काही वेळातच बेपत्ता झाले आणि क्रूशी संपर्क तुटला. कामचटका प्रदेशाचे आपत्कालीन परिस्थिती मंत्री सर्गेई लेबेदेव यांनी सांगितले की, प्राथमिक माहितीनुसार हेलिकॉप्टर क्रॅश झाले आहे. यानंतर आज बेपत्ता हेलिकॉप्टरच्या अवशेषाचा शोध लागला. रशियन  आपत्कालीन मंत्रालयाने टेलिग्रामद्वारे ही माहिती दिली. शोध मोहिमेदरम्यान १७ मृतदेह सापडले आहेत. दरम्यान, हेलिकॉप्टरमध्ये एकूण २२ जण होते, ज्यामध्ये १९ प्रवासी आणि तीन क्रू मेंबर्स होते. यातील १७ जणांचे मृतदेह पथकाच्या हाती लागले आहेत.

हे ही वाचा : 

राज्यपालांच्या हस्ते ५० युवा नादस्वरम वादकांना शिष्यवृत्ती प्रदान

गणेशोत्सवाच्या तोंडावर मुंबई पोलीस दलात बदल्यांचे वारे

कंटेनर चालकाचे हातपाय बांधले आणि चक्क ‘ऍपल’ फोन पळवले !

इंडिगो विमानात कागदाच्या तुकड्यावर लिहिली होती बॉम्बची धमकी !

दरम्यान,  Mi-८T हे ट्विन-इंजिन हेलिकॉप्टर आहे, ज्याची रचना १९६० मध्ये करण्यात आली होती. रशियाशिवाय हे हेलिकॉप्टर इतरही अनेक देश वापरतात, मात्र या हेलिकॉप्टरला अपघातांचाही मोठा इतिहास आहे.

Exit mobile version