बेपत्ता इंडोनेशियन महिला मृतावस्थेत आढळली अजगरच्या पोटात!

तीन दिवसांपासून होती बेपत्ता

बेपत्ता इंडोनेशियन महिला मृतावस्थेत आढळली अजगरच्या पोटात!

मध्य इंडोनेशियामधील एका महिलेला एका अजगराने गिळल्याने तिचा मृत्यू झाला आहे.तीन दिवसांपासून बेपत्ता असलेली इंडोनेशियन महिला अजगराच्या पोटात मृतावस्थेत आढळल्याने आल्याने महिलेच्या कुटुंबियांना आणि गावकऱ्यांना एकच धक्का बसला.

इंडिया टुडेच्या बातमीनुसार, एएफपी वृत्तसंस्थेला एका स्थानिक अधिकाऱ्याने शनिवारी(८जून) ही माहिती दिली.फरीदा (४५) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.दक्षिण सुलावेसी प्रांतातील कालेमपांग गावातील ती रहिवासी आहे.तीन दिवसांपासून ती बेपत्ता होती.महिलेचा पती आणि रहिवाशांनी तिचा शोध घेतला असता शुक्रवारी (७ जून) एका अजगराच्या पोटात मृतावस्थेत आढळून आली.अजगराची लांबी मोजली असता सुमारे ५ मीटर (१६ फूट) इतकी होती.

हे ही वाचा:

पूजा तोमरने रचला इतिहास, यूएफसीमध्ये फाईट जिंकणारी पहिली भारतीय महिला!

कंगना रानौतला थप्पड मारणारी सीआयएसएफची जवान मागतेय माफी

एअर कॅनडाच्या विमानाला टेकऑफनंतर आग; विमान सुरक्षितपणे उतरवण्यास यश!

काँग्रेसच्या प्रमुखांना पंतप्रधानांच्या शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण!

फरीदा ही गुरुवार पासून बेपत्ता होती. त्यांनतर तिचा शोध घेण्यास सुरवात करण्यात आली, असे गावचे प्रमुख सुआर्दी रोसी यांनी एएफपीला सांगितले.तिचा शोध घेत असताना गावातील परिसरात तिच्या काही वस्तू तिच्या पतीला सापडल्या.त्यानंतर काही वेळातच एक भला मोठा अजगर दिसला, ज्याचे पोठ फुगले होते, असे गावचे प्रमुख सुआर्दी रोसी यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, अजगराचे पोट कापण्यास सहमती दर्शविल्यानंतर त्याचे पोट फाडण्यास सुरुवात केली.त्यांनतर बेपत्ता असलेच्या फरिदाचे डोके लगेचच दिसले.त्यांनतर फरिदाला बाहेर काढण्यात आले, अजगराने तिला गिळल्याने तिचा मृत्यू झाला होता.दरम्यान, अशा घटना दुर्मिळ आहेत.परंतु, इंडोनेशियामध्ये अलिकडच्या वर्षांत अजगरांनी संपूर्ण व्यक्ती गिळल्यानंतर अनेक मृत्यू झाले आहेत.

Exit mobile version