पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेस सरकारमधील एका मंत्र्याला महिला अधिकाऱ्यासोबत गैरवर्तन करणे चांगलेच महागात पडले आहे. त्यामुळे त्यांना आपल्या मंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. अखिल गिरी असे राजीनामा देणाऱ्या टीएमसी मंत्र्यांचे नाव असून ते ममतांच्या मंत्रीमंडळात तुरुंगमंत्री होते. भाजपने मुद्दा उचलून धरल्यानंतर पक्षाने अखेर अखिल गिरी यांच्यावर कारवाई करत मंत्री पदाचा राजीनामा देण्यास भाग पाडले. मिळालेल्या माहितीनुसार, पक्षाच्या सूचनेनुसार अखिल गिरी यांनी मेलद्वारे आपला राजीनामा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी याना पाठवला असून उद्या होणाऱ्या विधानसभा अधिवेशनात ते आपल्या राजीनाम्याची हार्ड कॉपीही मुख्यमंत्र्यांना सादर करणार आहेत.
अखिल गिरी यांचा एक व्हिडिओ समोर आल्यानंतर त्यांना आपल्या मंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. जिल्हा वन अधिकारी मनीषा शाऊ व त्यांचे पथक ताजपूर समुद्रकिनाऱ्याजवळील वनविभागाच्या जमिनीवरील अतिक्रमण हटवत होते. या कारवाईदरम्यान मंत्री घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी महिला अधिकाऱ्याशी वाद घालण्यास सुरुवात केली.
अखिल गिरी यांनी महिला अधिकाऱ्याला धमकावत म्हटले की, तू सरकारी कर्मचारी आहेस, माझ्यापुढे नतमस्तक हो… बघ, आठवडाभरात तुझे काय होते. या प्रकरणी अधिक दखल देशील तर, पुन्हा जाऊ शकणार नाहीस. हे गुंड तू रात्री घरी जाऊ शकणार नाहीत याची खात्री करून घेतील. तुझी पद्धत सुधार नाहीतर मी तुला काठीने मारेन. या घटनेचा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला.
हे ही वाचा..
या हिंदू द्वेष्ट्याचे उद्धव ठाकरे कान उपटणार का?
बांग्लादेशात पुन्हा हिंसाचार भडकला, ३२ जणांचा मृत्यू !
पॅरिस ऑलिम्पिक: सेमीफायनलमधील पराभवानंतर सेनचे कांस्यपदकावर ‘लक्ष्य’
भारतीय हॉकी संघाने ब्रिटनला नमवले; पदकापासून एक पाऊल दूर !
अखिल गिरीच्या व्हायरल व्हिडिओवरून भाजपने ममता सरकारवर टीका केली आहे. भाजपने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडे याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी केली. भाजपने आपल्या सोशल मीडिया हँडलवर लिहिले की, ममता बॅनर्जी या मंत्र्याला हाकलून तुरुंगात पाठवण्याचे धाडस करतील का? सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये अडथळा आणणे आणि महिलेच्या प्रतिष्ठेचा अपमान केल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल होणार का? या महिलेला जीवे मारण्याची अप्रत्यक्ष धमकी देणाऱ्या आणि तिच्या प्रतिष्ठेचा अपमान करणाऱ्या या गुंडाला तुरुंगात टाकले जाते का, ते बघू, असे भाजपने म्हटले आहे. भाजपने जोर धरल्यानंतर तसेच सर्वत्र ठिकाणाहून टीका झाल्यानंतर टीएमसी पक्षाकडून अखेर अखिल गिरी यांना आपल्या पदाचा राजीनामा देण्यास सांगितले.
West Bengal Minister Akhil Giri threatens a lady Forest Officer because she was performing her duty to remove illegal encroachment in forest areas.
What did he say –
1. "সরকারি কর্মচারী, মাথা নিচু করে কথা বলবেন।" – You are a government employee, bow down your head (infront of… pic.twitter.com/CDrULP9Mli
— BJP West Bengal (@BJP4Bengal) August 3, 2024